Reserved Toilat For Class 1 Officers Viral Photo : अनेक सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचारी आणि तिथे येणाऱ्या लोकांसाठी अनेकदा वेगवेगळे वॉशरुम्स असतात. कर्मचाऱ्यांसाठी राखीव वॉशरुम्सना टाळे लावलेले असते, सध्या सोशल मीडियावर सरकारी कार्यालयातील अशाच एका वॉशरुमचा फोटो व्हायरल होत आहे, जो पाहून अनेकांनी तीव्र संपात व्यक्त केला आहे. या फोटोमध्ये तीन युरिन पॉट दिसतायत, जे केवळ क्लास १ अधिकाऱ्यांसाठी राखीव आहेत. यामुळे इतर कर्मचारी आणि अधिकारी त्याचा वापर करू शकत नाहीत. अनेकांनी पदानुसार कसा भेदभाव केला जातो हे पाहून तीव्र संताप व्यक्त केला आहे. बाथरूममधील भिंतींवर सर्वत्र रिझर्व्ह असे पोस्टर चिटकवल्याचे दिसून येत आहे.

विशेष बाब म्हणजे रस्त्यापासून ते संसदेपर्यंत समानतेची हाक सुरू असताना हा फोटो समोर आला आहे. हा फोटो @mudit_gupta25 नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “कृपया पोस्टर काळजीपूर्वक वाचा आणि विचार करा, तुम्ही ज्याची कल्पना केली होती हा तोच भारत आहे का? खूप लज्जास्पद. ”

व्हायरल फोटोत एकूण ५ युरिन पॉट दिसत आहेत, ज्यातील दोन युरिन पॉटच्यावर ‘केवळ क्लास १ अधिकाऱ्यांसाठी’ असे लिहिलेले दिसत आहे. वर पाहता इतर ३ युरिन पॉट हे सर्वसामान्य लोकांच्या वापरासाठी आहेत असे दिसते.

सरकारी कार्यालयातील वॉशरुममधील हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच, ज्यावर अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी सरकारी कार्यालयातील वॉशरुममधील हे नियम भेदभाव करणारे आहेत असे म्हटले आहे. यावर एका युजरने कमेंट केली की, केंद्र सरकारच्या अनेक विभागांमध्ये ही स्थिती आहे. एकाच मजल्यावर मात्र अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र वॉशरुम आहेत. ते स्वतःला देवाच्या समान समजतात. दुसऱ्याने लिहिले की, इंग्रज भारतातून गेले, पण भारतात ती उच्चभ्रू वर्गाची मानसिकता अजूनही तशीच आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकांनी केल्या मजेशीर कमेंट्स

काही युजर्स या ‘बाथरूम रिझर्वेशन सिस्टिम’ची खिल्लीही उडवत आहेत. यावर एकाने मजेशीर कमेंट केली की, ‘ग्रेड-१ अधिकारी त्यांच्या बाथरूममध्ये आता सुरक्षा व्यवस्थेची मागणीही करू शकतात.’