Operation Sindoor Fact Check Video Photo : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरनव व्हॅलीत २२ एप्रिल २०२५ रोजी दहशतवाद्यांनी गोळीबार करत २६ जणांचा जीव घेतला. या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला. याचाच बदला घेण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांनी ६ व ७ मेच्या रात्री ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कारवाई करत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील नऊ दहशतवादी तळांवर मिसाईल डागत ते उद्ध्वस्त केले.
यानंतर सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूरशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. पण काही व्हिडीओ, फोटो असेही आहेत, ज्याचा ऑपरेशन सिंदूरशी काहीही संबंध नाही. पण, तेही जुने व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, त्यामुळे आम्ही असे व्हायरल होणारे चार फोटो, व्हिडीओंचे सत्य तपासले.
दावा १:
एक्स युजर्स वॉचर अॅनॉनने पाकिस्तानने भारताविरुद्ध प्रत्युत्तर दिल्याचा दावा करणारा व्हिडीओ शेअर केला.

इतर अनेक युजर्सदेखील असाच व्हिडीओ शेअर करत होते.
तपास :
आम्ही व्हिडीओमधून मिळालेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च केला.
यावेळी आम्हाला एक्सवरील २०२० मधील एक पोस्ट आढळून आली, ज्यामध्ये असे सूचित होते की, हा व्हिडीओ लेबनॉनच्या बेरूत येथील आहे.
आम्हाला ५ ऑगस्ट २०२० च्या एका बातमीत व्हिडीओ कॅप्चरदेखील सापडला.
https://www.mirror.co.uk/news/world-news/beirut-explosion-horrifying-videos-capture-22470730
दावा २ :
एक्स युजर रिपोर्ट काश्मीरने एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की, पाकिस्तानने भारताचे राफेल विमान पाडले.
इतर युजर्सदेखील तोच फोटो शेअर करत आहेत.
तपास :
आम्ही फोटोवर रिव्हर्स इमेज सर्च वापरून तपास सुरू केला.
यावेळी आम्हाला २०२१ मधील बातम्या सापडल्या.
https://timesofindia.indiatimes.com/city/chandigarh/iaf-pilot-dies-in-mig-21-crash-near-moga-in-punjab/articleshow/82819809.cms

या बातम्यांमध्ये असे म्हटले आहे की, शुक्रवारी पहाटे पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील लांगेना गावात मिग-२१ लढाऊ विमान अपघातात भारतीय हवाई दलाचा एक पायलट मृत्युमुखी पडला. पायलटची ओळख आयएएफ एमसीसी स्क्वॉड्रन लीडर अभिनव चौधरी अशी झाली आहे, तो अपघात झाला तेव्हा रात्रीच्या प्रशिक्षणावर होता.
दावा ३ :
इन्स्टाग्राम युजर जॅकने रात्री आकाशातून क्षेपणास्त्रे डागल्याचे दाखवणारा व्हिडीओ शेअर केला आहे, तसेच तो व्हिडीओ ऑपरेशन सिंदूरचा असल्याचा दावा केला आहे.

हा व्हिडीओ अनेक माध्यमे, संस्था आणि इतर सोशल मीडिया युजरनेही शेअर केला होता.
तपास :
यावेळी आम्ही व्हिडीओमधून मिळालेल्या कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च करून तपास सुरू केला.
सात महिन्यांपूर्वी पोस्ट केलेला हाच व्हिडीओ आम्हाला डीडी इंडियाच्या यूट्यूब चॅनेलवर सापडला.
व्हिडीओचे शीर्षक होते : नेगेव वाळवंटातील नेवाटीम एअरबेसला लक्ष्य करणारे इराणी क्षेपणास्त्रे.
दुसऱ्या व्हिडीओमध्ये असेही सुचवण्यात आले आहे की, हा व्हिडीओ इस्रायलवर इराणने केलेल्या हल्ल्याचा आहे.
दावा ४ :
एक्स युजर जनार्दन मिश्रा यांनी ऑपरेशन सिंदूरशी संबंधित असल्याचा दावा करणारा व्हिडीओ शेअर केला.

तपास :
व्हिडीओमधून मिळालेल्या कीफ्रेम्सवर आम्ही रिव्हर्स इमेज सर्च केले.
तेव्हा हा व्हिडीओ १४ एप्रिल रोजी hasoon.assi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला होता.
हाच व्हिडीओ १५ एप्रिलच्या सुमारास अनेक सोशल मीडिया युजर्सनीही शेअर केला होता आणि तो पॅलेस्टाईनमधील असल्याचे म्हटले होते.
निष्कर्ष :
भारतीय सशस्त्र दलांनी केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असंबंधित, जुने फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. पण, व्हायरल होणारे हे व्हिडीओ जुन्या घटनांचे आहेत, त्यामुळे व्हायरल दावे दिशाभूल करणारे आहेत.