scorecardresearch

Premium

Optical Illusion: फोटोमधील वृद्ध शोधतोय त्याच्या हरवलेल्या बायकोला; तुम्ही त्याची मदत करू शकता का?

ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.

optical illusion
photo(social media)

Optical Illusion: सोशल मिडीयावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पाडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. सध्या सोशल मिडीयाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असंच एक कोडे खूप चर्चत आहे. ज्यात एक वृद्ध माणूस त्याच्या हरवलेल्या पत्नीला शोधण्याचा प्रयत्न करत आहे. त्या वृध्दाच्या पत्नीला तुम्हाला शोधायचे आहे. आतापर्यंत अनेकजणांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यापैकी फक्त १% लोकांनाच हे कोडं सोडवता आलं आहे. जर तुमची नजर देखील तीक्ष्ण असेल, तर तुम्ही देखील हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करा.

तुम्हाला वृध्दाची बायको दिसली का?

( हे ही वाचा: Optical Illusion: शेतात लपलाय भयानक साप; अवघ्या १५ सेकंदात शोधणारे ठरतील ‘सुपर स्मार्ट’)

woman mistakenly sat on another person bike instead of boyfriend funny video
तरुणी प्रियकराऐवजी अनोळखी व्यक्तीच्या गाडीवर जाऊन बसली अन् मग..विचित्र घटनेचा VIDEO
shubhangi galande bold decision of pregnancy happy single mother
मला आई व्हायचंय… म्हणणाऱ्या शुभांगी गलांडेच्या ‘या’ धाडसी निर्णयाचे सोशल मीडियावर कौतुक; पाहा…
how to turn off WhatsApp blue ticks
आता WhatsApp वर मेसेज वाचले तरी कुणाला कळणार नाही; हे कसे करायचे ते पाहा
a husband dance with wife sitting on wheelchair emotional video goes viral
“नवरा असावा तर असा!” व्हीलचेअरवर बसलेल्या पत्नी बरोबर केला सुंदर डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल

चित्राच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या चॅलेंजमध्ये एक वृद्ध व्यक्ती आपल्या हरवलेल्या पत्नीला मोठ्या चिंतेत शोधताना दिसत आहे. एका बाजूला वृद्धांचे घर दिसते, तर डावीकडे हिरवीगार झाडी दिसत आहे. डोक्यावर हात ठेवून तो हातामध्ये काठी घेऊन उभा आहे, तो आपल्या बायकोला शोधण्यासाठी दूर दूर पाहत आहे. पण त्याची पत्नी शोधून देण्यासाठी तुम्हाला मदत करायची आहे. पण लक्षात ठेवा की या कठीण आव्हानात आतापर्यंत ९९ टक्के लोक अयशस्वी ठरले आहेत. तरीही त्या व्यक्तीला मदत करायची असेल तर म्हाताऱ्याचे प्रेम आणि काठी यांच्यात बारकाईने पाहावे लागते.

पायाजवळ लपली आहे वृध्दाची बायको

हरवलेली स्त्री चित्रातच दडलेली आहे. ते शोधण्यासाठी अगदी हुशार लोकांनाही जमणार नाही. पण असे म्हणतात की जे प्रयत्न करतात ते कधीही हार मानत नाहीत. त्याचप्रमाणे काही लोक नक्कीच असतात ज्यांची बुद्धिमत्ता तल्लख असते. त्यांच्यापैकी काहींना ती स्त्री सापडली, जी माणसाच्या पाय आणि काठीच्या मध्ये हिरव्या गवतासारखी लपलेली होती. तुम्हाला अजूनही ही स्त्री दिसली नसेल तर खाली दिलेला फोटो पहा.

( हे ही वाचा: Optical Illusion: या चित्रात कोणता प्राणी लपलेला आहे? फक्त १% लोकांनीच दिले अचूक उत्तर)

असे भ्रम मजेदार आहेत

लोकांना सोशल मीडियावर असे ऑप्टिकल भ्रम सोडवणे आवडते. असे कोडे सोडवल्यानंतर अनेकांना आत्मविश्वास मिळतो.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Optical illusion can you find women face in this picture within 10 seconds gps

First published on: 29-09-2022 at 18:14 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×