ऑप्टिकल इल्युजनचे व्हायरल होणारे फोटो तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. प्रवासादरम्यान किंवा दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा ऑप्टिकल इल्युजनमधील कोडी सोडवणे, त्यातील चॅलेंज स्वीकारणे हा अनेकांच्या सवयीचा भाग झाला आहे. यामुळे विचार करण्याच्या क्षमतेला चालना मिळते असे म्हटले जाते. असाच ऑप्टिकल इल्युजनचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.
ऑप्टिकल इल्युजनच्या या फोटोमध्ये एक कपाट दिसत आहे. कपड्याने भरलेल्या या कपाटात इतरही काही वस्तु दिसत आहेत. या सगळ्याबरोबरच या कपाटात एक मांजर देखील लपली आहे, ही मांजर कुठे आहे ते शोधण्याचे चॅलेंज आहे. तुम्हाला ही मांजर कुठे आहे ते शोधता येतय का पाहा.
फोटो :

जर तुम्हाला या फोटोमध्ये मांजर कुठे आहे ते ओळखता आले नसेल, तर पुढील फोटो पाहून तुम्हाला ते स्पष्ट होईल.

या फोटोमध्ये १० सेकंदात मांजर शोधण्याचे चॅलेंज तुमच्या मित्रांनाही देऊ शकता.