Optical Illusion: सोशल मिडीयावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पाडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. सध्या सोशल मिडीयाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असंच एक कोडे खूप चर्चत आहे. या फोटोत एक प्राणी संग्रहालय दिसत आहे. यात अनेक प्राणी दिसत आहेत. या प्राण्यांमध्ये एक माकड आहे जे लपले आहे. या हरवलेलया माकडाला तुम्हाला शोधायचे आहे. आतापर्यंत अनेकजणांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यापैकी फक्त १% लोकांनाच हे कोडं सोडवता आलं आहे. जर तुमची नजर देखील तीक्ष्ण असेल, तर तुम्ही देखील हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करा. हे कोडे तुमच्या व्यक्तिमत्वाचा खुलासा करते.
प्राणी संग्रहालयात लपलेले माकड शोधून दाखवा
खरं तर, हे असे चित्र आहे ज्यातून प्राणीसंग्रहालयाचा एक भाग दिसत आहे. यामध्ये समोर काही जिराफ आहेत आणि दुसऱ्या बाजूला लोक त्यांचे फोटो काढत आहेत. दरम्यान, एक माकडही बसले आहे. चित्रात हे माकड नेमके कुठे आहे ते शोधा आणि सांगा. या चित्राची गंमत म्हणजे हे माकड अजिबात दिसत नाही. कलाकाराने या माकडाला अशा प्रकारे लपवले आहे की ते सहसा दिसत नाही. मात्र तुम्ही नीट निरीक्षण करून पाहिल्यास तुम्हाला हे माकड नक्की दिसेल.
( हे ही वाचा: Optical Illusion: ‘या’ फोटोत किती प्राणी लपले आहेत? ५ की ३? अचूक उत्तर देणारा ठरेल जिनियस)

येथे लपलेय माकड
तुम्हाला माकड दिसले का? दिसले असेल तर तुम्ही खरच हुशार आहात. जे लोक हे माकड शोधू शकले नाहीत त्यांना आम्ही योग्य उत्तर सांगणार आहोत. या चित्रात हे माकड खूपच लहान आहे. चित्राच्या डाव्या बाजूला जी टोपली दिसते, त्यात काही गवत सारखे साहित्य पडलेले आहे. या टोपलीत हे माकड बसले आहे. माकडाला चित्रासोबत अशा प्रकारे सेट केले आहे की ते दिसत नाही पण काळजीपूर्वक निरीक्षण केल्यावर माकड कुठे आहे हे कळते.