Optical Illusion: आयफोन हा आतापर्यंतचा सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन आहे तसंच सर्वात महाग देखील आहे. सर्वात पहिला iPhone २००७ मध्ये लाँच झाला होता. यावर्षी आयफोन १४ सीरीज लाँच करण्यात आली आहे. मात्र, १५० वर्षे जुन्या चित्राने लोकांना आश्चर्यचकित केले आहे. काही लोकांना १५० वर्षे जुन्या पेंटिंगमध्ये आयफोन दिसत आहे. जेव्हापासून लोकांना हे पेंटिंग मिळाले, तेव्हापासून वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत. काही जण याला जादू मानत आहेत तर काही जण ते खरे असल्याचे मानत आहेत. मात्र, जर आयफोन पहिला फोन २००७ मध्ये आला असेल तर वरील छायाचित्रात मुलीच्या हातात अनेकांना कसा काय आयफोन दिसला? तुम्हालाही या चित्रात आयफोन दिसत आहे का? तर जाणून घेऊया यामागचे नेमकं सत्य..

तरुणीच्या हातात लोकांना आयफोन दिसला

या पेंटिंगला द एक्स्पेक्टेड वन असे म्हणतात. या पेंटिंगला ऑस्ट्रियन चित्रकार फर्डिनांड जॉर्ज वाल्डम्युलर यांनी १८६० मध्ये तयार केले होते. या चित्रात एक मुलगी डोंगराच्या मधोमध असलेल्या वाटेवरून चालताना दाखवण्यात आली आहे. वाटेने थोडे पुढे गेल्यावर हातात फुले घेतलेला मुलगा वाट पाहताना होता. पण पेंटिंगचा विचित्र भाग म्हणजे मुलीच्या हातातील एक छोटा आयताकृती बॉक्स आहे ज्याकडे ती एकटक पाहत आहे, नेटिझन्सचा असा विश्वास आहे की हा बॉक्स आयफोन आहे आणि ती तो फोन स्क्रोल करत आहे.

( हे ही वाचा: Optical Illusion: फोटोमधील वृद्ध शोधतोय त्याच्या हरवलेल्या बायकोला; तुम्ही त्याची मदत करू शकता का?)

१५० वर्षे जुन्या चित्रावर वाद सुरू झाला

हा संपूर्ण युक्तिवाद सुरू करणारा पहिला व्यक्ती पीटर रसेल होता. VICE च्या अहवालानुसार, रसेल आणि त्यांचे सहकारी १८व्या आणि १९व्या शतकातील कलाकृती असलेल्या न्यु पिनाकोथेक या कला संग्रहालयाला भेट देत होते. येथेच रसेलने द एक्स्पेक्टेड वन पाहिले आणि लगेच सांगितले की पेंटिंगमधील मुलीकडे आयफोन आहे. पण १८६० मध्ये आयफोन कसा आला?

याचे उत्तर सोपे आहे. कला तज्ञांनी उघड केले आहे की मुलीकडे फक्त प्रार्थना पुस्तक आहे. आपल्या श्रद्धेवर एकनिष्ठ असलेली मुलगी आणि तिच्याबद्दल आपुलकी दाखवण्याचा प्रयत्न करणारा पुरुष यांच्यातील फरक हे चित्र अधोरेखित करत आहे. पण अनेकांनी याबाबत केलेली कल्पना खूपच मजेशीर आहे.