Optical Illusion: सोशल मिडीयावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. सध्या सोशल मीडियावर एक ऑप्टिकल इल्युजन ट्रेंड होत आहे. या इल्युजनवरून तुमचा दृष्टिकोन ओळखण्यास मदत होईल असेही सांगण्यात येत आहे. ऑप्टिकल इल्युजन म्हणजे एक प्रकारची बुद्धिमता चाचणी असते अगदी स्पर्धा परीक्षांमध्येही उमेदवारांची समज व दृष्टी जाणून घेण्यासाठी याचा वापर केला जातो. तसेच तुमच्यातील तर्कशुद्ध बाजू जाणून घेण्यासाठी ही चाचणी घेतली जाते. सध्या व्हायरल होणाऱ्या या ऑप्टिकल इल्युजनकडे पाहून आपल्याला नेमकी कोणती गोष्ट सर्वात आधी दिसतेय हे नक्की सांगा.

सोशल मीडियावर हा फोटो आतापर्यंत ९ लाख ७२ हजार लोकांनी पाहिलेला आहे. यामध्ये तुम्हाला सर्वात आधी कावळा दिसतोय की माणूस असा प्रश्न विचारलेला आहे. जर तुम्हाला सर्वात आधी यामध्ये कावळा दिसला असेल तर तुम्ही विचारांनी फार पक्के आहात व नियमित नियमांचे पालन करणे आपल्याला खूप आवडते असे समजता येईल. आणि जर तुम्हाला दगडांच्या लगोरीतून साकारलेला माणसाचा चेहरा दिसला तर तुम्ही चौफेर दृष्टीकोन असणाऱ्यांपैकी एक आहात असे समजता येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्हाला या प्लॅटमध्ये नेमकं काय दिसलं हे कमेंट करून नक्की कळवा. तसेच ही गोष्ट लक्षात घ्या की, ऑप्टिकल इल्युजनमधून व्यक्तिमत्वाची चाचणी हा एक अंदाज असतो त्यात तथ्य असेलच असा कोणताही दावा करता येत नाही.