टी- २० विश्वचषक स्पर्धेत भारताने काल (३ नोव्हेंबर रोजी)अफगाणिस्तानचा ६६ धावांनी पराभव केला आहे. भारतीय चाहते संघ फॉर्ममध्ये आल्याचा आनंद साजरा करत असताना, पाकिस्तानी ट्विटर अकाउंटवरून मॅच फिक्सिंगचा, #Shame ट्रेंड करत आहे.

भारताविरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. परिणामी भारताने या टी- २० विश्वचषकातील सर्वात मोठी धावसंख्या बनवली. त्याचवेळी अफगाणिस्तानच्या फलंदाजांना फलंदाजीत विशेष काही करता आले नाही. भारताचा हा विजय ‘कट्टर-प्रतिस्पर्धी’ पाकिस्तानच्या समर्थकांना फारसा पचनी पडला नाही. त्यांनी मॅच फिक्सिंग आणि शेम असे हॅशटॅग चालवायला सुरुवात केली.

( हे ही वाचा: पाककडून हारल्यानंतर तुम्ही TV फोडला का? विचारणाऱ्याला आकाश चोप्राचं भन्नाट उत्तर, “मित्रा, आमच्याकडे…” )

( हे ही वाचा: याला म्हणतात हर कुत्ते का दिन आता है… सिंह कुत्र्याला घाबरुन पळाला अन् व्हिडीओ व्हायरल झाला )

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने २ बाद २१० धावा केल्या. रोहित शर्माने ७४ आणि केएल राहुलने ६९ धावांची शानदार खेळी केली. दोन्ही खेळाडूंनी पहिल्या विकेटसाठी विक्रमी १४० धावांची भागीदारी केली.त्यानंतर अखेरच्या षटकात हार्दिक पांड्याने ३५ आणि ऋषभ पंतने २७ धावा करत भारताला दोनशे धावांच्या पुढे नेले.

प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ सात गड्यांच्या मोबदल्यात १४४ धावाच करू शकला. करीम जन्नतने नाबाद ४२ आणि कर्णधार मोहम्मद नबीने ३५ धावांचे योगदान दिले. भारताकडून मोहम्मद शमीने तीन आणि रविचंद्रन अश्विनने दोन गडी बाद केले. याशिवाय रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांना प्रत्येकला एक एक यश मिळाले.