Mob Assault Woman In Pakistan पाकिस्तानात लोकशाहीचा स्तर दिवसेंदिवस ढासळत चालला आहे. तेथे पेहराव, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबतही खूप वाईट परिस्थिती आहे. तेथील ही परिस्थिती स्पष्ट करणारे एक प्रकरण सध्या समोर आले आहे. या प्रकरणात एका महिलेला तिच्या कपड्यांमुळे जमावाच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले; ज्यामुळे तिथे ‘मॉब लिचिंग’सारखी परिस्थिती निर्माण झाली होती. पण, एका महिला पोलीस अधिकाऱ्यामुळे ती महिला बचावली. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाकिस्तानात महिलेच्या कुर्त्यावरून वाद

समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना पाकिस्तानमधील लाहोर येथे घडली आहे. या घटनेसंबंधीच्या माहितीनुसार- एका महिला पाकिस्तानातील अचरा बाजारात पतीसह एका हॉटेलमध्ये जेवणासाठी आली होती. यावेळी तिने परिधान केलेल्या ड्रेसवर अरेबिक भाषेतील मजकूर प्रिंट केलेला होता. पण, तेथील लोकांना तिच्या ड्रेसवरील तो मजकूर हा कुराणातील आयत (मजकूर) आहे, असे वाटले; ज्यामुळे त्यांनी त्या महिलेवर धार्मिक भावनांना ठेच पोहोचवल्याचा आरोप केला. त्यानंतर जमावातील लोकांनी तिच्याशी अर्वाच्च भाषेत बोलण्यास सुरुवात केली. अनेक जण तिच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करीत होते; पण एका महिला पोलीस अधिकाऱ्याने वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने ती सुदैवाने वाचली. पोलिसांनी तिला संरक्षण देत संतप्त जमावातून सुखरूपपणे बाहेर नेले. या घटनेच्या व्हिडीओत ती महिला आणि तिचा पती जमावाला पाहून घाबरलेल्या अवस्थेत हॉटेलमध्ये उभे असल्याचे दिसतेय.

Operation Meghdoot, Siachen,
विश्लेषण : पाकिस्तानला चकवा देत सियाचिनवर कब्जा… थरारक ‘ऑपरेशन मेघदूत’ मोहीम कशी फत्ते झाली?
Miller Mathew
‘No Comments’ : भारत पाकिस्तानात घुसून दहशतवादी मारतं का? अमेरिकेचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्त म्हणाले…
Five Chinese nationals and their Pakistani driver were killed
पाकिस्तानात चीनच्या कर्मचाऱ्यांवर हल्ले सुरूच; आत्मघातकी हल्ल्यात पाच चिनी अभियंते ठार
PNS Siddique naval base under attack
चीनची गुंतवणूक असलेल्या पाकिस्तानच्या हवाई तळावर हल्ला; या आठवड्यातली दुसरी घटना

महिला पोलीस अधिकाऱ्याच्या शौर्याचे कौतुक

व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक महिला पोलीस अधिकारी असे म्हणताना ऐकू येत आहे की, महिला तिच्या पतीबरोबर खरेदीसाठी गेली होती. यावेळी जमावाने तिच्यावर हल्ला केला. इतकेच नाही, तर तिने परिधान केलेले अरबी प्रिंटेड कपडे तिला काढण्यास सांगितले. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती अन् दहशतीचे वातावरण निर्माण झाले. परंतु, ती परिस्थिती चिघळण्यापूर्वीच सावरणाऱ्या त्या महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव एएसपी सय्यदा शाहराबानो नक्वी, असे आहे. या घटनेसंबंधीचा व्हिडीओ पंजाब पोलिसांनी शेअर केला आहे; ज्यात घटनास्थळी संतप्त झालेल्या जमावाला शांत करून परिस्थिती नियंत्रणात आणणाऱ्या महिला पोलीस अधिकारी सय्यदा यांचे त्यांनी कौतुक केले आहे. या व्हिडीओमध्ये ही महिला पोलीस अधिकारी जमावाला शांत करीत, नंतर रेस्टॉरंटमध्ये घाबरून बसलेल्या महिलेला बाहेर आणत जमावापासून सुखरूप दूर नेताना दिसतेय. महिला पोलीस अधिकारी सय्यदा यांनी दाखविलेल्या या शौर्याबद्दल पंजाब पोलिसांनी त्यांना मानाच्या ‘कायद-ए-आजम’ पुरस्काराने सन्मानित केले.

या एएसपी सय्यदा यांनी वेळीच त्या महिलेला वाचवले नसते, तर धर्माच्या नावावर तिची हत्या झाली असती, असे एका युजरने लिहिले आहे. अनेकांनी त्या महिलेच्या समर्थनार्थ कमेंट्स करीत दावा केला की, तिच्या ड्रेसवरील प्रिंटेड मजकूर म्हणजे फक्त काही अरबी शब्द आहेत. त्यांचा कुराणातील मजकुराशी काहीही संबंध नाही.

मुंबईत धावत्या लोकलमध्ये तरुणीचा अश्लील डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप; म्हणाले, “गांभीर्य ओळखून…”

महिलेने मागितली माफी

दरम्यान, या घटनेनंतर संबंधित महिलेला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यावेळी माहिती देताना त्या महिलेने, “मला कुर्ता आवडला म्हणून मी तो विकत घेतला. लोक असा विचार करतील, असं वाटलं नव्हतं. माझा कोणालाही दुखावण्याचा किंवा कुराणाचा अपमान करण्याचा हेतू नव्हता”, असे म्हणत माफीही मागितली आहे.