Pakoda Seller Viral Video:

पावसाळ्यात गरमागरम भजी, पकोडे खाण्याची मजा काही औरच असते. परंतु, स्वत:च्या हाताने हे पदार्थ करून खाण्यापेक्षा कोणी आपल्याला ते खाऊ घातले तर आनंद द्विगुणीत होतो. याच शोधात आपण अनेकदा स्टॉलवरील भजी, पकोड्यांचा आनंद लुटण्यासाठी जातो. परंतु, कधी स्टॉलवरील भजीचा आस्वाद घेताना तुम्ही उकळत्या तेलात हात घालून भजी सर्व्ह करणाऱ्या विक्रेत्याला पाहिलयंत का?

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. या व्हिडीओत पकोडे तळून विकणारी व्यक्ती चक्क उकळत्या तेलात हात घालून पकोडे सर्व्ह करत आहे.

व्हायरल व्हिडीओ (Pakoda Seller Viral Video)

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती पकोडे विक्रेत्याकडे जाते आणि त्या विक्रेत्याला म्हणते की, “सर मला एक प्लेट पकोडे द्या.” यावेळेस एका मोठ्या भांड्यात उकळत्या तेलात विक्रेता पकोडे तळत असतो. पकोड्याची ऑर्डर येताच विक्रेता उकळत्या तेलात हात घालतो आणि एक पकोडा बाहेर काढतो आणि प्लेटमधून ग्राहकाला सर्व्ह करतो.

हेही वाचा… गुलाबी साडी, कमरपट्टा अन्…, मनीमाऊचा VIDEOतील अस्सल मराठमोळा लूक पाहून नेटकरी म्हणाले, “नखरेवाली…”

हे पाहताच ग्राहक अचंबित होतो आणि पकोडे विक्रेत्याला म्हणतो की, “ही कोणती पद्धत आहे पकोडे सर्व्ह करण्याची सर, तुमचा हात भाजत नाही का?”, तर यावर विक्रेता म्हणतो, “माझा तर हाच अंदाज आहे.”

स्टॉल नेमका आहे तरी कुठे?

‘foodiehindustani24’ या फूड ब्लॉगरने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. ‘किशन पकोडा’ असे त्या विक्रेत्याच्या स्टॉलचे नाव असून हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेक युजर्सने या प्रसिद्ध विक्रेत्याला ओळखले. हा स्टॉल राजस्थानमधील लोकप्रिय ठिकाणांपैकी एक असल्याचे मानले जाते. अनेक फूड ब्लॉगर्सनी याआधीही या विक्रेत्याचे व्हिडीओ शेअर केले आहेत. जयपूरच्या मोती कटला (moti katla) बाजार परिसरात पकोड्याचा हा स्टॉल असल्याचे सांगितले जाते. डिश सर्व्ह करण्याच्या अनोख्या पद्धतीने हा स्टॉल चर्चेचा विषय ठरला आहे.

हेही वाचा… हद्दच झाली! कारवर चढली महिला अन् झालं असं काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रया

व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “त्याच्या हसण्यामागे दुःख लपलं आहे.” तर अनेक जण त्या विक्रेत्याचा हात भाजला कसा नाही, यावर तर्क-वितर्क लावत होते. याबद्दल बोलताना एक जण म्हणाला की, “त्याने आधी हाताला थंड पाणी लावलं असणार आणि मग तेलात हात घातला असणार (cold water physics) ” एकाने तर ‘चिन टपाक डम डम’चा इमोजी शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.