Panipuri Stall Owner Viral Video: आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी जो तो दिवसरात्र झटत असतो, मेहनत करत असतो. यासाठी अनेक जण लहान मोठा व्यवसाय करतात. छोटीशी टपरी, ठेला किंवा दुकान उभारतात आणि कमाई करतात.

रस्त्यालगत आपला ठेला चालवणारी ही माणसं अगदी कष्टानं भरउन्हात उभे राहून आपला छोटासा कारभार चालवतात. पण, काम सुरू होण्यापूर्वीच जर एखाद्याचं भलमोठं नुकसान झालं तर त्याचं खूप वाईट वाटतं. सध्या अशीच एक घटना एका पाणीपुरी विक्रेत्याबरोबर झाली आहे आणि याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

हेही वाचा… “जबाबदारी अशी गोष्ट आहे की…”, ट्रक चालकाचा ‘हा’ व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये एका पाणीपुरी ठेला चालकाचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय. यात पाणीपुरीचा ठेलाच पूर्ण खाली कोसळल्याचं दिसतंय. पाणीपुरीला लागणारं साहित्य, सगळी भांडी, पुरीचं पाकीट, चटणी सगळं रस्त्यावर सांडलंय. या सगळ्या नुकसानात चालक सगळं सामान उचलतोय. आजूबाजूला माणसांची गर्दी जमा झालीय, पण कोणीही मदत करायला पुढे आलं नाही.

हेही वाचा… रीलसाठी ओलांडली मर्यादा! तरुणीने डान्स करता करता परदेशी व्यक्तीबरोबर केलं असं काही की…, VIDEO पाहून नेटकरी संतापले

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @viral_brijesh_vlogs या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “घरसे निकलने के बाद नहीं पता होता है की अच्छा होगा या बुरा” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल ३३.३ मिलियन व्ह्यूज आले आहेत. तरी ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकले नाही.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “हे ज्याने कोणी केलंय ते खूप चुकीचं आहे, अशी लोकं गरिबांच्या पोटावर लाथ मारत आहेत.” तर दुसऱ्याने “बघण्याऐवजी त्याला मदत करा” अशी कमेंट केली, तर एकाने कमेंट करत लिहिलं, “या कलियुगात कोणीही मदत करत नसून फक्त तमाशा बघत उभे राहिले आहेत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा… बापरे! रेल्वे रुळावर उभा होता अन् मागून आली ट्रेन, पुढे जे झालं ते पाहून उडेल थरकाप, पाहा VIDEO