Viral video: ट्रेननं प्रवास करणं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. कमी वेळात आणि कमी खर्चीक असा हा प्रवास आहे. मात्र या प्रवासात येणारे अनुभव हे प्रत्येकवेळी वेगवेगळे असतात. असाच एक अनुभव काही प्रवाशांना आला आहे. दिल्लीच्या आनंद विहार टर्मिनलवरून गाझीपूरला जाणाऱ्या सुहेलदेव सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या दोन डब्यांमध्ये अचानक वीज गेल्याची घटना घडली. आता तुम्ही म्हणाल यात काय नवीन, रेल्वेमध्ये तांत्रिक बिघाड होण्याची ही काय पहिलीच वेळ नाही. मात्र या तांत्रिक बिघाडामुळे लोकांनी काय केलं हे ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल.

ट्रेनमधली वीज गेली

दिल्लीतल्या आनंद विहार टर्मिनलवरुन सुहेलदेव सुपरफास्ट एक्स्प्रेस निर्धारित वेळेत उत्तरप्रदेशमधल्या गाझीपूरसाठी रवाना झाली. पण थोडं अतंर पार केल्यानंतर ट्रेनमधली बत्तीच गुल झाली. वीज गेल्यामुळे ट्रेनमधला एसीही बंद पडला. एसी बंद झाल्याने ट्रेनमधील लहान मुलं, महिला आणि वृद्धांना त्रास जाणवू लागला. गर्मीमुळे प्रवाशांची वाईट अवस्था झाली. प्रवासी संतप्त झाले. प्रवाशांनी आपला सगळा राग ट्रेनमधल्या टीसीवर काढला आणि चक्क टीसीची कॉलर पकडून थेट ट्रेनच्या टॉयलेटमध्येच बंद केलं. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

प्रवाशांनी टीसीला टॉयलेटमध्ये बंद केलं

वीजपुरवठा खंडित झाल्याने प्रवाशांनी तिकीट कलेक्टरला रेल्वेच्या टॉयलेटमध्ये कोंडून ठेवले. ट्रेनमध्ये गोंधळ झाल्याची माहिती मिळताच आरपीएफ आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून प्रवाशांना शांत केले आणि इंजिनीअर्सना बोलावून इलेक्ट्रिकल बिघाड दुरुस्त करण्यात आला. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आनंद विहार टर्मिनलवरून सुटल्यानंतर सुहेलदेव सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या B1 आणि B2 डब्यांमध्ये वीज गेली. यासोबतच या दोन्ही डब्यांच्या एसींनीही काम करणे बंद केल्याने संतप्त प्रवाशांनी या वीजकपातीची तक्रार तिकीट कलेक्टरकडे केली. वीज खंडित झाल्याने त्रासलेल्या प्रवाशांनी टीटीईला याचे कारण विचारले असता ते समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे अनेक प्रवासी नाराज झाले आणि त्यांनी टीसीला टॉयलेटमध्ये बंद केलं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – VIDEO: आईसोबत पोळपाट लाटणं विकायचा, पैशाअभावी लायब्ररीतूनही हकललं; मात्र संघर्षातून आज मुंबई पोलिसात झाला भरती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी सुहेलदेव एक्सप्रेस (22420) दिल्लीच्या आनंद विहार टर्मिनलवरून उत्तर प्रदेशातील गाझीपूरला जात होती. त्यानंतर एक्स्प्रेसच्या B1 आणि B2 डब्यांची लाइट गेली. नंतर सुहेलदेव एक्सप्रेस तुंडला स्थानकावर आल्यावर आरपीएफ आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रवाशांची समजूत घालून त्यांना शांत केले आणि इलेक्ट्रिकल बिघाड दूर करण्यासाठी अभियंत्यांना बोलावले. यानंतर गाडी गाझीपूरला रवाना करण्यात आली.