What is Pathan Besharam Rang Controversy: शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यावरून सध्या वाद पेटला आहे. ‘अश्लील दृश्य’ दाखवताना भगव्या रंगाच्या कपड्यांचा वापर केल्यावरून राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. भगव्या रंगाच्या बिकीनीमुळे आमच्या भावना दुखावल्याचेही नरोत्तम मिश्रा यांनी म्हंटले होते. पीटीआयच्या माहितीनुसार वीर शिवाजी नावाच्या गटाने केलेल्या आंदोलनामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता शाहरुख खानचे पुतळे सुद्धा जाळण्यात आले. दरम्यान या वादाने सोशल मीडियावर सुद्धा आक्रमक रूप धारण केले आहे. नेटकऱ्यांनी शाहरुख, दीपिकाचे समर्थन करत निषेध करणाऱ्यांनाच धारेवर धरलं आहे. यावेळी अक्षय कुमारचा एक फोटो सुद्धा तुफान व्हायरल होत आहे.
ट्विटरवर #BoycottBesharamRang #BoycottDeepika, #BoycottShahrukhKhan ट्रेंड होत असताना काहींनी अक्षय कुमार व कतरीना कैफचा एक फोटो शेअर करायला सुरुवात केली आहे. भगव्या बिकिनीवरून भावना दुखावल्या पण जेव्हा अक्षय कुमारने भगवी साडी नेसलेल्या कतरीनाच्या पोटावर किस करत अश्लील सीन दिला होता तेव्हा तुम्ही कुठे होतात असा प्रश्न नेटकऱ्यांनी केला आहे.
दे दना दन या चित्रपटात कतरीनाने गले लग जा या गाण्यात भगव्या रंगाची साडी नेसली होती. मुळात ही साडी ज्या पद्धतीने नेसली होती त्याला बिकिनीच म्हणणे योग्य ठरेल अशाही प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. पण मग यावेळी तुम्हाला काही त्रास झाला नाही का? असा प्रश्न नेटकरी करत आहेत.
दरम्यान, मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी चित्रपटात दीपिकाच्या बिकिनीच्या रंगासह गाण्याच्या बोलांवरही आक्षेप नोंदवला आहे. “‘पठाण’ हा चित्रपट दोषपूर्ण असून विषारी मानसिकतेवर आधारित आहे. ‘बेशरम रंग’ गाण्याचे बोल आणि गाण्यात घातलेले भगवे आणि हिरवे कपडे यामध्ये निर्मात्यांनी बदल करणे आवश्यक आहे. नाही तर चित्रपटाचे प्रदर्शन मध्य प्रदेशात होऊ द्यायचे की नाही याचा निर्णय आम्ही घेऊ,” असं गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले आहे.