Viral Video : सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात जे पाहून यूजर्सना अनेकदा घाम फुटतो, तर काही वेळा अंगावर सर्रकन काटा येतो. नुकताच असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून यूजर्सना स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास ठेवण कठीण जात आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये शहरातील एका जत्रेदरम्यान एक व्यक्ती भल्यामोठ्या आकाश पाळण्यावर जीवघेणे स्टंट करताना दिसत आहे. या व्यक्तीची स्टंटबाजी पाहून आपल्याला शक्तिमानची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.
जत्रेदरम्यान लोकांचं अनेक प्रकारचे आकाशपाळणे, झुले आपण पाहतो. या वेळी अधिकाधिक लोकांना आपल्या झुल्याकडे किंवा आकाशपाळण्याकडे आकर्षित करण्यासाठी काही झुलेचालक विश्वास बसणार नाही असे वेगवेगळे जीवघेणे स्टंट आणि कारनामे करत असतात. जे लोकांचं लक्ष वेधतात. त्यामुळे ते पाहण्यासाठी लोकांची गर्दी उसळते. अशाच एका जत्रेतील स्टंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती मोठ्या आकाश पाळण्यावर स्टंट करताना दिसत आहे.
आकाशपाळण्यावर व्यक्तीचा धोकादायक स्टंट
हा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला जात आहे. जो आता इन्स्टाग्रामवर ghantaa नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती फिरत्या आकाशपाळण्याच्या लोखंडी रॉडला धरून हवेत कधी वर जाताना आणि नंतर खाली येताना दिसत आहे. साधारणपणे कोणीही असा स्टंट करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल, पण ही व्यक्ती न घाबरता अगदी आरामात स्टंटबाजी करते. व्हिडीओमध्ये दिसणार्या व्यक्तीचे स्टंट पाहून काही यूजर्सनी आपलं डोकंच धरलं.
सध्या हा जत्रेतील खतरनाक स्टंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर यूजर्सचे लक्ष वेधत आहे. हा व्हिडीओ आत्तापर्यंत ६ लाख ८७ हजारांहून अधिक वेळा पाहण्यात आला आहे आणि ३४ हजारांहून अधिक यूजर्सनी लाइक केलं आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर यूजर्स आश्चर्यकारक कमेंट करताना दिसत आहेत. तर अनेक यूजर्स मजेशीर कमेंट्स करत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिलं की, ‘मार्वलवाले याला उचलून घेऊन जायला नकोत.’ तर दुसर्या एका यूजरने ‘भाऊ, याला मरायचं आहे का?’ असा सवाल उपस्थित केला आहे. बहुतेक यूजर्सनी या व्यक्तीला ‘खतरों का असली खिलाडी’ असं म्हटलं आहे.