Trending News: पेट्रोल २० रुपये लिटर, जीएसटी शून्य, गावात तीन नवी विमानतळं… नाही नाही स्वप्न नव्हे ही सगळी एका गावच्या निवडणुकीत उमेदवाराने दिलेली आश्वासने आहेत. ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या निवडणुकीत एका दिलदार व्यक्तिमत्वाने आश्वासनांची अशी उधळण केली आहे की हे पाहून नेटकरी आम्हालाही याच गावात जायचं असा मजेशीर हट्ट धरून बसले आहेत. या एका व्हायरल फोटोने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. तुम्हीही जेव्हा या विशाल हृदयाच्या उमेदवाराची निवडणूक प्रचारपत्रिका पाहाल तेव्हा तुम्हीही हसून हैराण झाल्याशिवाय राहणार नाही.

ओडिशा आयपीएसचे माजी अधिकारी अरुण बोथरा यांनी ट्विटर हॅण्डलवर निवडणुकीची प्रचारपत्रिका शेअर केली आहे. इतकंच नव्हे तर कॅप्शनमध्ये त्यांनी या गावात राहायला जाण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. सिरसाढ़ नामक एका गावाच्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ही प्रचारपत्रिका छापली आहे. उमेदवाराचे नाव जयकरण लठवाल असे असून ते सरपंच पदासाठी उमेदवार आहेत..

काय आहेत भावी सरपंचाची आश्वासने?

तुम्ही पोस्टरमध्ये पाहू शकता की सुरुवातीला तर उमेदवार जयकरण यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. यानंतर त्यांनी चक्क १३ आश्वासने देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गावात रोज मन की बात कार्यक्रम होणार, महिलांना मोफत मेकअप किट देणार, गावात एक दोन नव्हे तर चक्क तीन नवी विमानतळे उभारणार, बेवड्यांना एक एक बॉटल रोज तर दिल्लीपर्यंत मेट्रो लाईन सुरु करणार. प्रत्येक कुटुंबाला एक मोफत बाईक देणार आणि बरं का मंडळी हे सगळं बाजूला सोडा पण समजा गावात कोणाला हृदयविकाराचा झटला आला तर पाच मिनिटात गावात हेलिकॉप्टर उतरणार. एवढं सगळं या पोस्टर मध्ये लिहिलेलं आहे.

सरपंच हिरोला पडतोय भारी..

Video: फक्त भात खाणारी ७५ वर्षाची ‘शाकाहारी मगर’ पाहिलीत? अंत्यसंस्काराला पाणावले सर्वांचे डोळे

दरम्यान, एवढे भन्नाट दावे करणारे जयकरण निवडून येणार का? तुम्हाला या गावात राहायला जायचंय का? निर्णय नंतर घ्या पण सध्या ही पोस्ट पाहून मज्जा करायला विसरू नका.