अपघात कधी, कुठे आणि कशामुळे होऊ शकतो हे सांगता येत नाही. कितीही सावधगिरी बाळगली तरी होणारे अपघात रोखता येत नाहीत. पण अनेकदा अशा काही गोष्टींमुळे एखाद्या व्यक्तीचा अपघात होतो, ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. एका तरुणीबरोबरही असाच काहीसा प्रकार घडला आहे, ज्याबाबत तिने सोशल मीडियावर आपला अनुभव शेअर केला आहे. या तरुणीच्या डोक्याला केसांच्या क्लिपमुळे गंभीर दुखापत झाली आहे. संबंधीत तरुणीचा एक भीषण अपघात झाला पण या अपघातातून ती सुखरुप वाचली परंतु केसांना लावलेल्या प्लास्टिकच्या क्लिपमुळे तिच्या डोक्याला मात्र गंभीर जखम झाली आहे. यामुळे प्लास्टिकचा क्पिल वापरताना आता सावधगिरी बाळगली पाहिजे.

अनेक महिला केस बांधण्यासाठी प्लास्टिकच्या क्लिपचा वापर करतात. ज्याला अनेकजणी क्लच असेही म्हणतात. बाजारात तुम्हाला क्लिपचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. वेगवेगळ्या डिझाइन आणि रंगाचे हे क्लिप प्लास्टिक, लोखंड किंवा काहीवेळा काचेचे देखील बनवलेले असतात. पण अशाच प्रकारचा क्लिप एका तरुणीच्या जीवावर बेतला आहे, केसांना लावलेल्या क्लिपमुळे तिच्या डोक्याच्या मागच्या बाजूस टाके पडले आहेत. मात्र हे नेमक कशामुळे घडल याबाबतचा अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

संबंधित तरुणीने सांगितले की, ती कार चालवत असताना अचानक तिचे कारवरील नियंत्रण सुटले आणि तिच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात तिच्या कारमधील एअरबॅग उघडल्या. त्यामुळे सुदैवाने तिला कोणताही गंभीर दुखापत झाली नाही. पण अपघातावेळी केसांना लावलेल्या प्लास्टिक तिच्या डोक्याच्या मागच्या बाजूस घुसला, ज्यामुळे तिच्या डोक्यातून रक्ताच्या तीव्र धारा वाहू लागल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जेव्हा तरुणीला हॉस्पीटलमध्ये शुद्ध आली तेव्हा तिला काय झालं हे समजले. अपघातामुळे तिला डोक्याला दुखापत झाली हे समजले पण ती कशामुळे झाली हे समजल्यानंतर तिला मोठा धक्काच बसला. याबाबत लोकांना जागरुक करण्यासाठी आता महिलेने तिची कहाणी शेअर केली आहे. तसेच महिलांना तिने क्लिप ऐवजी रबर बँड वापरण्याची विनंती केली आहे. तिचे नशीब बलवत्तर म्हणून तिचे प्राण वाचले, अन्यथा हा अपघात तिच्यासाठी जीवघेणा ठरु शकला असता. curlyhair.coo नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.