एखाद्या गुन्ह्यात माणसाला अटक होते सामान्य आहे. याबद्दल तुम्ही अनेक बातम्या ऐकल्या असतील. मात्र यावेळी पोलिसांनी एका गायीला हल्ल्याप्रकरणी अटक केली आहे. हे ऐकून तुम्हाला नक्कीच थोडं आश्चर्य वाटेल. मात्र पोलिसांनीच याला दुजोरा देत गायीला तसेच तिच्या मालकाला ताब्यात घेतल्याचे सांगितले आहे.

हे प्रकरण दक्षिण सुदानमधील लेक्स राज्याचे आहे. येथे एका गाईला शेतातील एका मुलावर हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. डेली स्टारच्या वृत्तानुसार, गायीच्या हल्ल्यामुळे मुलाचा तिथेच मृत्यू झाला. यानंतर आता गायीला रुम्बेक सेंट्रल काउंटी पोलिस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

“याला म्हणतात आविष्कार”; झाडावरून फळं तोडण्यासाठी केलेल्या हटके जुगाडामुळे आनंद महिंद्रा झाले प्रभावित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याआधीही सुदानमध्ये प्राण्यांना अटक करण्यात आली होती, त्यांच्यावर खटला चालवण्यात आला होता आणि नंतर त्यांना तुरुंगाचीही शिक्षा झाली होती. काही काळापूर्वी, एका ४५ वर्षीय महिलेच्या हत्येप्रकरणी एका मेंढीला अटक करण्यात आली होती, त्यानंतर तिच्यावर खटला चालवला गेला आणि शेवटी तिला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.

गाडीत बसलेल्या प्रवाशांना उतरवायची अनोखी पध्दत पाहिली का? पाहा Viral Video

मेंढीची शिक्षा पूर्ण झाल्यावर देशाच्या कायद्यानुसार ती मृत व्यक्तीच्या कुटुंबालाच दिली जाईल. इंडिपेंडंटने दिलेल्या वृत्तानुसार, सुदानमध्ये कोणत्याही पाळीव प्राण्याने एखाद्याला मारल्यास, शिक्षा संपल्यानंतर ते मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई म्हणून दिले जाते.