Viral Video : सोशल मीडियावर दरदिवशी अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ पाहून तर अंगावर काटा येतो आणि काही व्हिडीओ तर भावुक करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकला रस्त्यावर खेळ दाखवत पैसे कमावताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना वाईट वाटेल. कारण एवढ्या लहान वयात पोटा पाण्यासाठी या चिमुकल्याला हे करावं लागत आहे.
तुम्ही जत्रा किंवा सार्वजानिक ठिकाणी, उत्सवाच्या ठिकाणी रस्त्यावर खेळ दाखवणारे लोक पाहिले असतील. रस्त्यावर मुला बाळांना घेऊन आईवडील खेळ दाखवतात आणि समोर ठेवलेल्या प्लेटमध्ये लोक पैसे ठेवतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकला रस्त्यावर खेळ दाखवताना दिसत आहे. तो विठ्ठलासारखा दोन्ही हात कंबरेवर ठेवून उभा आहे त्याने कपाळावर टिळा लावला आहे आणि त्याच्या टोपीवर दोरी बांधली आहे. आणि या दोरीच्या दुसऱ्या टोकाला जड वस्तू बांधली. तो मान हलवत असल्यामुळे ती वस्तू स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे ते ओळखणे शक्य नाही.
व्हिडीओत तुम्हाला दिसेल की हा चिमुकला मान हलवून ती दोरी गोल गोल फिरवताना दिसत आहे. आणि दोरीसह ती जड वस्तू सुद्धा गोल गोल फिरत आहे. हा खेळ पाहायला अनेक लोक जमलेले आहे. काही लोक त्याच्या समोर ठेवलेल्या ताटात पैसे टाकत आहे. तो दाखवत असलेल्या खेळाला पाहू लोक ताटात पैसे टाकत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ वारीदरम्यानचा आहे. या व्हिडीओत दिसत असलेल्या दुकानाच्या बोर्ड वरून लक्षात येते की हा व्हिडीओ पुण्यातील लक्ष्मी रोडवरचा आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
godavari_tai_munde या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “गरीबी वय बघत नाही…” तर एका युजरने लिहिलेय, “परिस्थिती भाग पाडते, नाहीतर कोणाची इच्छा असते खेळायच्या वयात कष्ट करयाची..” आणखी एका युजरने लिहिलेय, “खरंच यार आयुष्यामध्ये परिस्थिती ना शरीराला काहीही करायला लावते बघा ना किती छोटा मुलगा आहे आणि दिवसभर त्याला तशी मान हलवायची आणि टोपीचा गोंडा तो गोल फिरवायचा कारण तो गुंडागोल फिरला आणि तो जर समाजाने बघितला तर समाज दहा रुपये टाकायला तयार होईल दादा नाहीतर कोणी त्या प्लेटमध्ये पैसे टाकणार नाही. हो एका परिस्थितीची आणि एका कलाकाराची सत्य परिस्थिती आहे” एक युजर लिहितो, “.बाळा तू विठू माऊलीची तू सेवा करतोय तर विठू माऊली सुद्धा तुझ्या पाठीशी आहे.”