शिक्षकांना भारतीय संस्कृतीमध्ये वंदनीय मानले जाते. काल ५ सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा झाला. हा दिवस शिक्षकांच्या कामाचा आदर करण्याचा आणि त्यांचे आपल्या आयुष्यातील महत्त्व समजून घेण्याचा आहे. सोशल मीडियावर शिक्षक विद्यार्थ्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. दरम्यान, एका प्राथमिक शिक्षकाचा व्हिडीओ चर्चेत आला आहे; ज्यामध्ये त्याने विद्यार्थ्यांबरोबर घालवलेला एक दिवस कसा असतो ते दाखवले आहे. सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

इन्स्टाग्रामवर englishwalesirrr नावाच्या अकाउंटवर एका व्यक्तीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ”प्राथमिक शिक्षक होणे सोपे नाही… पण, अवघडही नाही. वर्गात अनेक गोष्टी करण्याची गुरुकिल्ली एका साध्या गोष्टीपासून सुरू होते… ‘तुमच्या वर्गात उपस्थित राहा. जर तुम्हाला मुलांशी तुमचा बंध घट्ट करायचा असेल तर… त्यांच्यासोबत तुमचे दुपारचे जेवण घेणे सुरू करा. मी ते रोज करतो आणि रोज एका नवीन मुलासोबत बसतो. जेवण घेताना त्याच्याशी अनेक गोष्टींबद्दल बोलतो. माझ्या काही मुलं पाठ्यपुस्तकांमधून पटकन शिकत नाही, त्यांना सतत ताण असतो. त्यांच्यावर लक्ष केंद्रित करा. रोज स्वत:ला त्या मुलांपैकी एकासाठी समर्पित करा आणि हो, ही एक दिवसाची किंवा एका आठवड्याची गोष्ट नाही, वेळ लागेल. या प्रक्रियेवर विश्वास ठेवा. दयाळू व्हा, स्वतःला त्यांच्या जागी ठेवा.”

हेही वाचा – Teacher’s Day : जेव्हा विद्यार्थी शिक्षक बनून शाळेत येतात..

व्हिडीओमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांसोबत त्यांच्याशी गप्पा मारताना, त्यांना शिकवताना, त्यांना प्रोत्साहन देताना आणि त्यांचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शिक्षकांच्या जीवनाची एक झलक दाखवतो. व्हिडीओ २१ ऑगस्टला शेअर केला आहे. पोस्ट केल्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आतापर्यंत २.४ मिलियन लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे आणि ही संख्या वाढतच आहे. अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

हेही वाचा – विचित्रच आहे हे कुटुंब! दिसते माणसांसारखे, पण चालते प्राण्यांसारखे; त्यांना पाहून संशोधकही चक्रावले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकाने लिहिले की, ”आपल्या देशामध्ये तुमच्यासारख्या आणखी शिक्षकांची गरज आहे.” दुसऱ्याने म्हटले की, ”जर मला असे शिक्षक मिळाले तर मला प्राथमिक विद्यालयामध्ये पुन्हा जायला आवडेल.” तिसऱ्याने म्हटले की, ”मी स्वत: एक शिक्षक आहे आणि मला ते फार आवडते, मला शिक्षक असल्याचा गर्व आहे. पण, दुःखाची गोष्ट अशी की, अनेक लोकांची मानसिकता अशी नाही.” चौथ्याने सांगितले की, ”शिक्षण प्रेम आहे. ” पाचव्याने लिहिले की, ”प्रत्यक्षात प्रेम आणि दया भाव असणारा शिक्षक.”