scorecardresearch

अभिमानास्पद! मुलाची बारावीची गुणपत्रिका प्रवाशांसोबत शेअर करताना रिक्षाचालक बापाचा आनंद गगनात मावेना

विकास अरोरा यांनी एक फोटो लिंक्डइनवर शेअर केला आहे ज्यात एका ऑटोरिक्षा चालकाच्या मुलाची मार्कशीट आहे.

अभिमानास्पद! मुलाची बारावीची गुणपत्रिका प्रवाशांसोबत शेअर करताना रिक्षाचालक बापाचा आनंद गगनात मावेना
या ऑटोरिक्षा चालकाच्या मुलाने इयत्ता बारावीमध्ये ६०० गुणांपैकी एकूण ५९२ गुण मिळवले आहेत. (Indian Express File Photo/linkedin : Vivek Arora)

जगातील प्रत्येक पालकाला आपल्या मुलाने उत्कृष्ट व्हावे आणि स्वतःचे भविष्य घडवावे असे वाटते. यामध्ये समाजातील प्रत्येक वर्गातील पालकांचा समावेश होतो. अशातच जर त्यांच्या मुलांनी काही कौतुकास्पद कामगिरी केली तर पालकांच्या आनंदाला सीमाच राहत नाही. अशीच एक हृदयस्पर्शी घटना शेअर करण्यासाठी एका लिंक्डइन वापरकर्त्याने या वेबसाइटचा आधार घेतला आहे. विकास अरोरा यांनी एक फोटो शेअर केला आहे ज्यात एका ऑटोरिक्षा चालकाच्या मुलाची मार्कशीट आहे.

“आज महाराष्ट्रातील अकोला येथे एका लोकल ऑटोमध्ये प्रवास करत असताना, ऑटो चालकाने निखळ आनंदात त्याच्या मुलाची गुणपत्रिका आमच्यासोबत शेअर केली…. या मुलाचे गुण बघा….. तो एक तल्लख मुलगा आहे. वडिलांना आपल्या मुलाचे यश सांगताना करताना खूप अभिमान वाटत होता,” लिंक्डइन वापरकर्त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले.

६२५ कोटींचा मालक असलेला ‘Captain America’ वापरत होता ‘हा’ जुना फोन, कारण….

ऑटोरिक्षा चालकाच्या मुलाने इयत्ता बारावीमध्ये ६०० गुणांपैकी एकूण ५९२ गुण मिळवले होते आणि अशा उत्कृष्ट निकालानंतर कोणताही पालक आनंदाच्या सर्वोच्च शिखरावर असेल. या रिक्षाचालकाची सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी आणि मुलाला शिक्षण देण्यासाठी त्याने ज्या अडथळ्यांवर मात केली असेल, ते पाहता हा विजय आणखी गोड होतो.

The autorickshaw driver shared his son 12th result with the passengers
(Photo : linkedin/Vivek Arora)

या रिक्षाचालकाला ही चांगली बातमी त्याच्या सर्व प्रवाशांसोबत अभिमानाने शेअर करायची होती ही गोष्ट या घटनेला अधिक हृदयस्पर्शी बनवते. या पोस्टला ४५ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तसेच या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस आला आहे.

(Photo : linkedin/Vivek Arora)

“त्या मुलाचे अभिनंदन. त्याला उच्च शिक्षणासाठी मदत हवी असल्यास कृपया मला कळवा,” असे एका वापरकर्त्याने लिहिले. “तुम्ही फोटो काढला आणि ही बातमी शेअर केली याचा आनंद झाला. मी तेथे, त्या अभिमानी वडिलांचा आनंद शेअर करताना तुम्हाला होत असलेल्या आनंदाची कल्पना करू शकतो,” दुसर्‍या वापरकर्त्याने टिप्पणी केली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Proud moment while sharing the marks of 12th standard of the child with the passengers the joy of the autorickshaw driver did not skyrocket pvp

ताज्या बातम्या