Viral video: आपण सर्वांनीच तंत्रज्ञानाला आपल्या जीवनाचा एक भाग बनवला आहे. आपल्याला जेवढ्या सुविधा मिळतील तेवढ्या नेहमी कमीच वाटतात.मात्र याच सुविधा कधी कधी आपल्या जिवावर बेतू शकतात. लिफ्टमुळे आपला बराच वेळ वाचतो. हल्ली उंच उंच इमारतींना लिफ्टशिवाय पर्याय नाही. मात्र याच लिफ्ट दुर्घटनेच्या आपण अनेक घटना एकतो. अशीच एक घटना पुण्यात घडलीय, मात्र सुदैवानं यामध्ये लहान मुले थोडक्यात बचावली आहेत. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुण्यात एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून अक्षरशा काळजाचा ठोका चुकत आहे. लिफ्ट मधील दोन मुलांचा जीव अगदी थोडक्यात बचावला आहे. कारण, ही मुलं लिफ्टच्या बाहेर पडताच लिफ्ट दहाव्या मजल्यावरून खाली कोसळली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. तसेच या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोसायटीच्या सदस्यांनी या घटनेबाबत एफआयआर दाखल केला आहे. सुरक्षा उपाय सुधारण्यासाठी अधिकारी आता या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, काही मुलं लिफ्टमध्ये दिसत आहेत. ही मुलं ग्राऊंड फ्लोरला जात आहेत, ग्रऊंड फ्लोर येताच ही मुलं लिफ्ट बाहेर पडतात आणि पुढच्याच क्षणी लिफ्ट १० व्या मजल्यावरुन खाली कोसळते. काही सेकंदांचा फरक आणि मुलं या भिषण अपघातातून बचावली. पुण्यात सर्वत्र या घटनेची चर्चा सुरु आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – दिव्यांग वृद्धाचं भर रस्त्यात धक्कादायक कृत्य; व्हायरल VIDEO पाहून येईल संताप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

योग्य देखभाल न केल्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. आपण सर्वांनीच तंत्रज्ञानाला आपल्या जीवनाचा एक भाग बनवला आहे. आपल्याला जेवढ्या सुविधा मिळतील तेवढ्या नेहमी कमीच वाटतात.मात्र याच सुविधा कधी कधी आपल्या जिवावर बेतू शकतात. लिफ्टमुळे आपला बराच वेळ वाचतो. हल्ली उंच उंच इमारतींना लिफ्टशिवाय पर्याय नाही. शहरांमध्ये मोठमोठ्या इमारती असणं हे सामान्य आहे. मात्र त्याची योग्य देखभाल होणं गरजेचं आहे.