Pune Viral News: सुरक्षा हा अनेकदा मस्करीचा विषय मानला जातो. विशेषतः पुण्यात तर हेल्मेट न घालण्यावरून मिरवणारी मंडळीही यापूर्वी आपण सोशल मीडियावर पाहिली आहेत. याच विषयावरून अनेकदा मीम्स सुद्धा व्हायरल होत असतात. आता तर असंच काहीसं उदाहरण सोशल मीडियावर चांगलं चर्चेत आलं आहे. स्वतः पुणे पोलिसांनी सुद्धा या प्रकरणाची दखल घेऊन यावर ट्वीट केलं आहे. पुण्यात सध्या वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या मंडळींचे फोटो काढून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. पण यातील एका फोटोवर आता वेगळीच चर्चा रंगत आहे.

पुण्यातील एक जिम ट्रेनर मेल्वीन चेरियन याने काही दिवसांपूर्वी बाईक चालवताना हेल्मेट घातले नव्हते. असाच एक फोटो पुणे वाहतूक पोलिसांनी पुरावा म्हणून काढला होता. आता हा फोटो स्वतः मेल्वीन याने शेअर करत पोलिसांना गंमतीतच उत्तर देत म्हंटले की, “धन्यवाद पुणे पोलीस, मी या फोटोमध्ये छान दिसतोय” या आगाऊपणाला साथ देत या व्यक्तीने पुढे मी दंड भरेन असेही म्हंटले होते. या ट्वीटवर पुन्हा पुणे पोलिसांनी उत्तर देत मेल्वीनला त्याच्याच अंदाजात सुनावले आहे. तुझ्या काळ्या जॅकेटवर एक काळं हेल्मेट शोभून दिसलं असतं असं पोलिसांनी म्हंटल आहे.

पोलिसांसमोर आगाऊपणा

हे ही वाचा<< Video: लोकलच्या गर्दीत ‘ती’ बाई हट्ट धरून बसली; रेल्वेचालक खाली उतरला अन म्हणाला, “आधी चल.. “

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान हे एकूण प्रकरण मस्करीत झालं असलं तरी अशाप्रकारे सुरक्षा नियमांना मोडून हा विषय हसण्यावारी घेणे हे चुकीचे आहे. अशा प्रतिक्रिया या व्हिडिओवर दिसत आहेत. पुणे पोलिसांनीही कूल अंदाजात उत्तर दिले असले तरी नियम मोडणाऱ्यांना समज देणे गरजेचे आहे. दुसरीकडे या ट्वीटमध्ये मेल्वीनने म्हंटल्याप्रमाणे केवळ दंड हा नियम पाळण्याचा किंवा तोडण्याचा हेतू नाही त्यातून आपली सुरक्षा हा मुख्य मुद्दा आहे हे अधोरेखित होणे गरजेचे आहे.