Pune Viral video: एक वेळ चार पैसे कमी मिळाले तरी चालतील, पण जिथे स्वाभिमानाला ठेच पोहोचते अशा ठिकाणी काम करणार नाही. अशी काही लोकांची भूमिका असते. अनेकदा अशी मंडळी आपल्या कृतीमधून लोकांचं लक्ष वेधून घेतात. दरम्यान पुणेकरांचा नाद करु नये असे म्हणतात. याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. पुण्यात बॉसमुळे आणि कंपनीतील वर्क कल्चरमुळे तरुण नैराश्येत जाण्याच्या मार्गावर होता. म्हणूनच नोकरी सोडताना त्याने अशी काही कृती केली की पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल. या युवकाने नोकरी सोडल्याचा आनंद धुमधडक्यात साजरा केला. विशेष म्हणजे, नोकरी सोडल्यानंतर ऑफिसमध्ये ढोलताशा वाजवत डान्सही केला.
पुणेकरांचा नादच खुळा
पुणे, मुंबई, बंगळुरू, दिल्ली, हैदराबादसारख्या महानगरांमध्ये आयटी आणि कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी असतात. त्यामुळे, येथील नोकरी करणारे तरुण सातत्याने जॉब चेंज करतात. करिअर वाढीसाठी कधी चांगल्या संधींमुळे किंवा जुन्या कंपनीतील अडचणींमुळे आपल्याला नोकरी बदलावी लागते. मात्र एखाद्या ठिकाणी वारंवार अपमान होत असेल आपल्याला किंमत नसेल तर अशा ठिकाणी न राहता तिथून बाहेर पडणंच योग्य असतं. मात्र त्या कंपनीत झालेल्या त्रासाचं काय ? असाच प्रश्न या वैतागलेल्या तरुणाला पडला अन् त्यानं बॉसला अद्दल घडवण्याचं ठरवलं. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नोकरी सोडल्यावर शेवटच्या दिवशी या तरुणाने बॉससमोर ढोल वाचवत डान्स केला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
नोकरीचा राजीनामा देत बॉसला खुन्नस
अनिकेत नावाच्या तरुणाने ऑफिसची नोकरी सोडली आहे. तो ऑफिसमध्ये सेल्स असोसिएट म्हणून काम करत होता. पगारवाढ नसल्याने त्याने हा निर्णय घेतला होता. अनिकेतने आपल्या नोकरी सोडण्याचे कारण सांगितले आहे. मी गेल्या तीन वर्षांपासून कंपनीत नोकरी करत होतो. मात्र, गेल्या तीन वर्षात केवळ काही प्रमाणात माझ्या पगारात वाढ झाली. तसेच, कंपनीत काम करताना बॉसकडूनही आदर, सन्मान मिळत नव्हता. त्यामुळे, मी नोकरी सोडल्याचे अनिकेतने सांगितले. अनिकेतच्या नोकरीच्या शेवटच्या दिवशी त्याचे सहकारी मित्र एकत्र आले. विशेष म्हणजे त्यांनी कंपनीच्या कार्यालयाबाहेरच ढोल-ताशा आणला होता. कंपनी कार्यालयाबाहेरील हे दृश्य पाहून अनिकेतचा बॉस संतप्त झाल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> खतरनाक! पिसाळलेला बैल थेट दुकानात घुसला; टोकदार शिंग अन् पुढच्याच क्षणी…घटनेचा थरारक VIDEO व्हायरल
हा व्हिडीओ anishbhagatt नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला लाखोंमध्ये लाईक्स अन् व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच नेटकरी यावर भरभरुन कमेंट करत आहेत.