पुणे तिथे काय उणे याची प्रचिती देणारे कित्येक व्हिडीओ रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी पुणेरी पाट्या, कधी पुण्यातील रिक्षा-कारमागील हटके संदेश, कधी तर कधी पुणेकरांच्या हटके रिक्षा. पुण्यात जितकी चर्चा पुणेरी पाट्यांची होते तितकीच चर्चा पुण्यातील रिक्षावाल्यांची देखील होते. पुण्यातील रिक्षाचालकांचे कित्येक किस्से प्रत्येक पुणेकरांकडून तुम्हाला ऐकायला मिळतील. कधी एखादा रिक्षाचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना दिसतो तर कधी स्थानिक रिक्षाचालक अन् उबेर रिक्षाचालकांमध्ये होणाऱ्या वाद चर्चेत येतात. कधी कोणी अतरंगी रिक्षा चालवता दिसतो. कधी कोणता रिक्षाचालक हँडल ऐवजी स्टेअरिंग वापरून रिक्षा चालवताना दिसतो. रिक्षाचालक कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत येतील याचा काही नेम नाही. सध्या अशाच एका रिक्षा चालकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक रिक्षाचालक मोठा टॅब घेऊन फिरताना दिसत आहे. रिक्षाचालकाकडे मोठा टॅब पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

पुण्यात रिक्षा चालवताना अनेक रिक्षाचालक आजकाल गुगल मॅप वापरताना दिसतात. सहसा रिक्षा चालक मोबाईलवर गुगल मॅप बघतात आणि प्रवाशांना इच्छित स्थळी पोहचवतात. पण पुण्यातील एका रिक्षाचालकाकडे मोबाईल ऐवजी टॅब आहे हे पाहून अनेकांना धक्का बसला आहे. टॅब म्हणजे टॅब्लेट संगणक जो अगदी मोबाईलप्रमाणेच असतो फक्त त्याचा आकार मोबाईलपेक्षा मोठा असतो. तसेच त्याची किंमतही मोबाईलपेक्षा जास्त असते. आजच्या काळात जवळपास प्रत्येकाकडे मोबाईल असतो पण टॅब वापरणारे मात्र मोजकेच लोक आहे. अशा मोजक्या लोकांच्या यादीच एक रिक्षाचालकही आहे हे पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्रामवर super_pune नावाच्या पेजवर शेअर केला आहे. व्हायरल व्हिडिओ नेटकऱ्यांना आवडला आहे. अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की,” जगात भारी आपलं पुणे”

दुसऱ्याने उपाहसात्मक टिका करत म्हटले की, “बारकाच आहे की टॅब”

तिसऱ्याने म्हटले की, नकाशा मोठा असला की,”वाहतूक कोंडी स्पष्ट दिसते आणि प्रवाशांना वेळेवर पोहचवता येते”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चौथ्याने कमेंट केली की, “नाद करता काय, नाद करा पण पुणेकरांचा नाही, लोक यशस्वी व्हायला पुण्या येतात आणि जाताना नावं ठेवून जातात आणि फक्त जाण ठेवा पुण्याची. बास!”