Pune viral video: सोशल मीडियावर दर दिवशी अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. मागील काही वर्षांत देशातील गुन्हेगारी वाढल्याचं चित्र आहे. गावगुंड, चौकातील गुंडांनी कहर केल्याचं दिसतंय. अशातच पुण्यातल्या तरुणांची दादागिरी काही संपायचं नाव घेत नाहीये. कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले असताना नव नवीन आणि धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. पुण्यातील दोन तरुणांनी दिवसाढवळ्या केलेल्या गुंडागर्दीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बाईकस्वार तरुणांनी रस्त्यात बेशिस्तपणे गाडी चालवण्यासोबतच लोकांच्या जीवाशी ते खेळले आहेत. पुण्यातील हडपसरच्या एसटीसमोर चुकीच्या पद्धतीने गाडी चलवत या तरुणांनी हद्दच पार केली आहे. यावेळी बसचालक या तरुणांना बाजूला होण्यासाठी वारंवार हॉर्न वाजवत आहे, ओरडून सांगत आहे; मात्र हे तरुण बससमोरून बाजूला होत नाहीयेत. उलट आणखी हळू आणि चुकीच्या पद्धतीने गाडी चालवत सर्व मर्यादाच ओलांडत असल्याचं दिसत आहे. बस थांब्यावर उभे असलेले प्रवासी तसेच बसमध्ये असणारे प्रवासीही या तरुणांवर आरडा-ओरड करत आहेत, मात्र हे तरुण कोणाचंच न ऐकता त्यांनाच उलटं बोलून चुकीच्या पद्धतीने गाडी चालवत आहेत.

बाईकचालक आणि बसचालक यांच्यामध्ये आधी काहीतरी वाद झाला असावा, म्हणून आता हे तरुण एसटीचा रस्ता रोखून चालकाला त्रास देत असल्याचा अंदाज आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त करत ???तरुणाला तरुणांना कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आहेत. हा व्हिडीओ पाहा आणि तुम्हीच सांगा काय केलं पाहिजे अशा तरुणांचं?

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “नागिनीला कधी खवळायचं नाही” बायकोची मस्करी करणं आलं अंगलट; VIDEO चा शेवट पाहून पोट धरुन हसाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

punesnapshot नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक जण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हटलंय, “जेव्हा बसवाले रस्त्यामध्ये बस उभी करतात तेव्हा मागे ट्राफिक जाम होतं, तेव्हा कुठे जाते ही ताई” दुसरा म्हणतो, “एवढी हिम्मत येतेच कुठून?” आणखी एकानं “असं उगीच कोणी कोणाला त्रास देत नाही”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.