Viral Video : नुकताच २२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या खास दिवशी असंख्य लोक अयोध्येसह देशभरात जल्लोष साजरा करताना दिसून आली. उद्घाटनाच्या दिवशी अयोध्येत गर्दी होऊ नये म्हणून अनेक लोकांनी अयोध्येला जाणे टाळले पण आता मात्र अनेक जण प्रभू रामाच्या दर्शनासाठी अयोध्या नगरी जात आहे. सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सध्या असाच एक पुण्यातील ढोल पथकाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या ढोल पथकाने अयोध्येत मंदिराबाहेर ढोल वादन करत श्रीरामांना अनोखी मानवंदना दिली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Loksatta (@loksattalive)

Instagram friend sexually assaults young woman in nagpur
नागपूर : इंस्टाग्राम मित्राचा तरुणीवर लैंगिक अत्याचार
Loksatta vyaktivedh Vitthal Shanbhag Ranichi Bagh at Byculla Mumbai Jijamata Park
व्यक्तिवेध: विठ्ठल शानभाग
replica of Ram temple, Ram campaign,
ठाण्यात ठाकरे गटाकडून रामाचा प्रचार, राजन विचारेंच्या चैत्र नवरात्रोत्सवात राम मंदिराची प्रतिकृती
kolhapur, kolhapur s Ambabai Devi Idol, Ambabai Devi Idol Conservation, Urgent Call for Conservation, Ambabai Devi Idol in Original Form, Snake symbol, ambabai mandir, mahalakshmi mandir,
कोल्हापूर : अंबाबाईचे मूर्ती संवर्धन डोक्यावरील नागप्रतिमेसह व्हावे; भाविकांची मागणी

Dinanath Kholkar या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “श्रीराम पथक पुणे, यांनी २४ आणि २५ जानेवारीला अयोध्या इथे श्रीराम चरणी वादन सेवा केली, त्यातील हा एक छोटासा भाग.”
त्यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की असंख्य पुणेकर हातात ढोल आणि भगवा घेऊन ढोल वादन करताना दिसत आहे. त्यांनी पिवळा आणि पांढरा रंगाचा पोशाख परिधान केला आहे. राम मंदिराच्या बाहेर ते ढोलवादन करताना दिसत आहे. ढोलच्या आवाजात राम मंदिर दुमदुमलेले दिसत आहे. राम मंदिराबाहेर शिवरायांचा जयघोष ऐकून तुम्हालाही अभिमान वाटेल.

ढोल ताशा हा पुण्याची आण बाण आणि शान आहे. ढोल ताशा संस्कृती ही पुण्याची खास ओळख आहे. गणोशोत्सव असो किंवा कोणताही छोटा मोठा कार्यक्रम पुणेकर ढोल ताशा वाजवून उत्सव साजरा करतात. राम मंदिराच्या उद्घटानिमित्त उत्सव साजरा करण्यासाठी पुण्याच्या या ढोल पथकाने थेट अयोध्या गाठली आणि मंदिरासमोर शिवरायांचा जयघोष करुन ढोल वादन केले.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने लिहिलेय, “मला असे वाटते की जणू मंदिराच्या आतमध्ये श्रीरामाचा राज्यभिषेक होत आहे आणि बाहेर प्रजा उत्सव साजरा करत आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “दणदणीत”