Shocking video: गाडी चालवताना घाई करू नका, उगाचच ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करू नका अशा सूचना वाहतूक प्रशासनाकडून वारंवार दिल्या जातात. शिवाय रस्त्यांवर मोठमोठे सूचना फलक देखील लावलेले असतात. पण तरीदेखील काही लोकांना कसली घाई असते कोण जाणे. हे अतिउत्साही चालक भरधाव वेगाने गाड्या पळवून स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालतात.

वर्षभरात जगात हजारो लोक रस्ते अपघातात मारले जातात. कधी स्वत:च्या चुकीने अपघात होतो, तर कधी समोरच्या वाहनाच्या चुकीने अपघात होतो. कधी ड्रायव्हरला डुलकी लागते, तर कधी गाडीवरील नियंत्रण सुटते. तर कधी गाडीचा वेग अधिक असल्याने अपघात घडत असतात. ओव्हरटेकिंग किंवा लेन कटिंगमुळेही बरेच अपघात होतात. काही जणांना अतिआत्मविश्वास नडतो; तर काही जणांचा अंदाज चुकतो. सध्या पुण्यातील नवले ब्रीजवरील भयंकर एका अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पुण्यातील नवले ब्रीजच्या खाली पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. ट्रकने मिक्सरला जोरदार धडक दिली आहे. ट्रकचे ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रक थेड मिक्सर गाडीवर आदळला.मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास कात्रज चौकाकडून फरश्या घेऊन नवले पुलाच्या दिशेने येणारा ट्रक अचानक नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात पुढे गेला आणि रेडिमिक्स डंपर तसेच दोन कारला उडवत निघाला. धडक इतकी जोरदार होती की कार काही फूट पुढे ढकलल्या गेल्या आणि रस्त्याच्या मधोमध अडकल्या. अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. अपघातानंतर नागरिकांनी तत्काळ पोलिसांना कळवले. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. सुदैवाने कोणत्याही वाहनचालकाचा जीवितहानी झाली नाही.

पाहा व्हिडीओ

नवले पूल परिसरात यापूर्वीही अनेकदा अशा प्रकारचे अपघात घडले आहेत. या परिसरात सतत वाढणारी वाहतूक, ट्रकचा वेग आणि रस्त्यांची अरुंद रचना यामुळे हा परिसर ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून ओळखला जातो. नागरिकांनी अनेकदा येथे वाहतुकीवरील नियंत्रण वाढवावे अशी मागणी केली आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ puneupdates123 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.