Pune Viral Video : सोशल मीडियावर पुण्यातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ इतके भयानक असतात की पाहून अंगावर काटा येतो. सध्या पुण्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक गाय चक्क इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर गेल्याची दिसून येत आहे आणि तिला खाली उतरवण्यासाठी प्रशासन जे केले ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
हा व्हायरल व्हिडीओ पुण्यातील रविवार पेठेतील कापड गल्ली परिसरातील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका इमारतीच्या चक्क दुसऱ्या मजल्यावर गाय चुकून गेली पण तिला खाली उतरवणे म्हणजे कठीण काम होतं. शेवटी प्रशासनाच्या मदतीने गाईला खाली उतरवलं. गाईला उतरवण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल ती क्रेनच्या मदतीने गाईला खाली उतरवले आहे. यावेळी घटनास्थळी अनेक लोक जमले होते. या व्हिडीओवर लिहिलेय, “पुण्यातील रविवार पेठेत चुकून दुसऱ्या मजल्यावर गेलेल्या गाईला खाली उतरवण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली” सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
puneupdates123 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुण्यातील रविवार पेठेतील कापड गल्ली परिसरात एका इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर एक गाय गेली खरी, पण तिला खाली पुन्हा येता येईना, अग्निशमन दलाच्या मदतीने क्रेनच्या सहाय्याने गाईला खाली उतरवण्यात आले.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “पुण्यात कधी पण आणि काहीही होऊ शकत..” तर एका युजरने लिहिलेय, “ते नव्हं ती गाय दुसऱ्या मजल्यावर जाईपर्यंत लोक काय करत होती?” आणखी एका युजरने लिहिलेय, “हेच राहिलं होतं पाहायचं जगात भारी आपलं पुणे” एक युजर लिहितो, “प्रश्न हा आहे की ती वर गेलीच कशी?” तर एक युजर लिहितो, “नशीब घाबरून तिने उडी मारली नाही” या व्हिडीओवर काही युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.