Pune Video : पुणे हे एक ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. पुण्याचा इतिहास आणि येथील संस्कृती खूप लोकप्रिय आहे. दरवर्षी हजारो लोक पुणे दर्शनासाठी येतात. येथील शनिवार वाडा, लाल महाल, सारसबाग, खडकवासला धरण , आगाखान पॅलेस, सिंहगड, लोणावळा , श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, इत्यादी पर्यटन स्थळांना आवर्जून भेट देतात पण तु्म्ही पुण्यातील एक सुंदर मंदिर पाहिले आहे का? सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भव्यदिव्य असे मंदिर दाखवले आहे. हे मंदिर पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे मंदिर नेमके आहे तरी कुठे? त्यासाठी आपल्याला हा व्हिडीओ नीट पाहावा लागेल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक सुंदर मंदिर दिसेल. हे मंदिर थोडं उंचीवर स्थित आहे. मंदिरात जाण्यासाठी आणि येण्यासाठी दोन मार्ग दिसत आहे. त्या दोन्ही मार्गावर पायऱ्या आहेत. मंदिराची रचना अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसत आहे. मंदिराच्या आजुबाजूला निसर्गरम्य वातावरण आहे. पांढऱ्या दगडांचा वापर करुन हे मंदिर बनवण्यात आलं आहे.
punewatavaran या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “गेला आहात का पुण्यातील या सुंदर मंदिरात” पुढे त्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “गजानन महाराज मंदिर आळंदी, पुणे”

हेही वाचा : VIDEO : राम नाव लिहिलेला दगड पाण्यात बुडत नाही; रामसेतूचा पाण्यावर तरंगणारा दगड पाहिला का? पाहा व्हिडीओ

या व्हिडीओवर लिहिलेल्या कॅप्शनमधून तुम्हाला कळेल की हे मंदिर गजानन महाराजांचे असून पुण्याजवळील आळंदी येथे स्थित आहे. तुम्ही जर आळंदीला गेला तर या मंदिराला आवर्जून भेट द्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.या सुंदर मंदिरात गेला आहात का, असे कॅप्शनमध्ये विचारल्यामुळे अनेक युजर्सनी प्रतिक्रिया देताना ‘हो’ लिहिलेय. एका युजरने लिहिलेय, “आळंदी गजानन महाराज मंदिर” तर एका युजरने लिहिलेय, “हो, अत्यंत सुंदर मंदिर आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “हो गजानन महाराज मंदिर आहे, आळंदी”