Viral Video : सोशल मीडियावर दरदिवशी अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. कधी डान्स तर कधी गाणी, कधी स्टंटचे व्हिडीओ तर कधी मजेशीर कॉमेडी व्हिडीओ चर्चेत येतात. काही लोक त्यांच्या आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टी किंवा त्यांच्याबरोबर घडलेले चांगले वाईट क्षण सोशल मीडियावर शेअर करतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण एका पुणेरी काकांविषयी सांगताना दिसत आहे जे दररोज २०० कुत्र्यांना अन्न खाऊ घालतात. या व्हिडीओमध्ये या तरुणाने या काकांबरोबर संवाद साधला आहे. त्यांच्या संवादाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण सांगतो, “मी आता शिवाजीनगरहून निघालो तितक्यात मला हे काका भेटले जे इतक्या साऱ्या कुत्र्यांना जेवण देत आहे.” त्यावेळी हा तरुण त्या काकांना विचारतो, “काका तुमचं नाव काय आहे?” त्यावर काका म्हणतात, “माझं नाव संजय शिंदे आहे.” त्यानंतर हा तरुण विचारतो, “तुम्ही या कुत्र्यांना किती वर्षापासून जेवण भरवताहेत?” त्यावर काका सांगतात, “आठ वर्षांपासून. जर मी त्यांना खाऊ घातले नाही तर मला कसंतरी होतं. कोणीतरी जेवणासाठी माझी वाट पाहत आहे, असे वाटते” तरुण म्हणाला, “खूप मोठी गोष्ट बोललात तुम्ही..”
त्यानंतर पुढे व्हिडीओत तुम्हाला दिसेल की काका कुत्र्यांसाठी आणलेलं जेवण दाखवतात. चिकन सूप, मांजर आणि बूलडॉगसाठी चिकन, २० किलो बोन्स, पाच किलो चिकन आणि तीन किलो माइस, इत्यादी गोष्टी दाखवतात. हे पाहून तरुण थक्क होतो. काका सांगतात, “दररोज संध्याकाळी मी १३० कुत्र्यांना आणि ४० मांजरींना हे अन्न वाटप करतो”

पुढे तरुण विचारतो, “या साठी खूप पैसा लागत असेल?” त्यावर काका म्हणतात, “मी कोणाकडूनही मदत घेत नाही. जेव्हापर्यंत माझ्यामध्ये ताकद आहे, माझ्याकडे पैसे आहे. मी हे काम एकटे करणार.”
तरुण विचारतो, “तुम्ही आता कोणते काम करता?” काका सांगतात की त्यांचे पुण्यामध्ये ऑटेमोबाईलचे दोन शोरूम आहे.” त्यावर तरुण म्हणतो, “हल्ली लोक खूप दु:खी असतात पण तुम्ही तुमचा आनंद कोणत्या तरी गोष्टीमध्ये शोधला आहे. पुण्य करताना आनंद मिळतोच.” पुढे काका म्हणतात, “हे काम केल्यानंतर मला एवढा आनंद मिळतो की मला कोणत्याही प्रकारचे औषध किंवा ड्रिंक घेण्याची आवश्यकता भासत नाही.” पुढे ते या तरुणाला त्याचे नाव विचारतात. त्यावर तरुण सांगतो, “माझं नाव अभिषेक आहे. मी उज्जेनहून आलेलो आहोत, महाकालचे शहर.” हा संवाद ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. काही लोक या काकांचे चाहते व्हाल.

हेही वाचा : VIDEO: टायरवर बसून भरत होता हवा, पण पुढच्याच क्षणी ‘असं’ काही झालं की माणूस हवेत उडून जमिनीवर आदळला

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

extrovert_indian या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “एक आजोबा दररोज २०० कुत्र्यांनाअन्न खायला घालतात पैसा तुम्हाला आनंद देत नाही. दुसऱ्याच्या आनंदाचे कारण व्हा आणि तुम्हाला तुमचा आनंद मिळेल. तुमचे कारण शोधा.

हेही वाचा : भाजपा कार्यकर्त्यांकडून ईव्हीएम मशीनची चोरी; काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला कारवर हल्ला? VIDEO मुळे खळबळ; वाचा सत्य….

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हे आहेत खरे हिरो” तर एका युजरने लिहिलेय, “मी त्यांना एफसी रोडवर बऱ्याचदा पाहिले आहे ते कुत्र्‍यांना भरवताना दिसले होते.” आणखी एका युजरने लिहिलेय, “मी पुण्यातील आहे. मला तुम्हाला भेटायचं आहे.” एक युजर लिहितो, “या काकांना खरंच खूप मोठा सलाम” तर एक युजर लिहितो, “हा देवमाणूस आहे” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.