Woman Beaten Fact Check Video : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे, ज्यामध्ये काही पुरुष एका महिलेला मारहाण करताना दिसत आहेत. व्हिडीओसह असा दावा केला जात आहे की, हा व्हिडीओ पाकिस्तानचा आहे, ज्यात एका महिलेने पाकिस्तानने भारतावर केलेल्या हल्ल्याचे पुरावे मागितल्याने पुरुषांच्या एका गटाने तिला मारहाण केली. पण, खरंच अशाप्रकारची कोणती घटना घडली का? तसेच या व्हि़डीओमागचं सत्य काय याविषयी जाणून घेऊ…
काय होत आहे व्हायरल?
एक्स युजर मनोज सिंहने व्हायरल दाव्यासह व्हिडीओ शेअर केला आहे.

इतर सोशल मीडिया युजर्सदेखील अशाच दाव्यासह व्हिडीओ शेअर करत आहेत.


तपास :
आम्ही InVid टूलमध्ये व्हिडीओ अपलोड करून मिळालेल्या कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च करून तपास सुरू केला.
आम्हाला हा व्हिडीओ २८ एप्रिल रोजी इन्स्टाग्रामवर अपलोड केलेला आढळून आला, जो ऑपरेशन सिंदूरच्या आधीचा होता.

आम्हाला हाच व्हिडीओ २४ एप्रिल रोजी DAILY TAAS या फेसबुक पेजवर पोस्ट केलेला आढळला.

कॅप्शनमध्ये असे म्हटले आहे (अनुवादित) : मैत्री करण्यास नाकार दिल्याने काही संशयितांनी एका ट्रान्सजेंडर महिलेवर क्रूरपणे अत्याचार केले आणि तिचे केस पकडून तिला गाडीत कोंबून तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. ट्रान्सजेंडर महिला जोरजोरात ओरडल्यामुळे आणि तिने प्रतिकार केल्यामुळे संशयितांनी गोळीबार करत पळ काढला. ट्रान्सजेंडर महिला शहजाद ऊर्फ शहजादीच्या विनंतीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला, परंतु संशयितांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. ही दुर्दैवी घटना दानिवाल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वेहारी येथे घडली आहे.
आम्हाला २३ एप्रिल रोजी हाच व्हिडीओ एका इन्स्टाग्राम हँडलवरून अपलोड केलेला सापडला.

कॅप्शनमध्ये असे म्हटले आहे : वेगवेगळ्या वृत्तांनुसार ही घटना पंजाबमधील वेहारी येथे घडली. व्हिडीओमध्ये पाच ते सहा शस्त्र घेऊन असलेले पुरुष एका ट्रान्सजेंडर महिलेवर अत्याचार करून आणि गोळ्या झाडून तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. दुःखाची गोष्ट म्हणजे, जवळपास उभे असलेले कोणीही पीडितेला मदत करण्यासाठी आले नाही किंवा त्यांनी १५ हेल्पलाइनवर पोलिसांना कळवले नाही, यामुळे संबंधित पोलिस ठाण्याच्या पोलिसांच्या आणि पंजाब पोलिसांच्या कामगिरीवरही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी या क्रूर घटनेची तात्काळ गंभीर दखल घ्यावी.
आम्हाला या घटनेबद्दल एक बातमीदेखील मिळाली.
https://tribune.com.pk/story/2542874/transgender-person-tortured-in-public
निष्कर्ष : ऑपरेशन सिंदूरच्या आधी पाकिस्तानातील वेहारी येथे एका तृतीयपंथी महिलेवर झालेल्या हल्ल्याचा व्हिडीओ आता पाकिस्तानने भारतावर केलेल्या हल्ल्याचे पुरावे मागितल्याने एका पाकिस्तानी महिलेला केलेल्या मारहाणीच्या खोटा दाव्यासह व्हायरल केला जात आहे, त्यामुळे व्हायरल दावा खोटा आहे.