भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीसाठी हा सामना खूप खास होता, मोहालीच्या मैदानावर उतरताच विराट भारतीय संघासाठी १०० कसोटी सामने खेळणारा १२वा खेळाडू ठरला. मात्र, कोहली आपल्या डावात केवळ ४५ धावा करू शकला आणि लसिथ एम्बुल्डेनियाच्या षटकात गोलंदाजी करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र यानंतर सामन्याच्या तिसऱ्या दिवशी विराटने असे काही केले की चाहत्यांना खूप आवडले आणि आता याच घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.
सामन्याच्या तिसर्या दिवशी समोरच्या संघाच्या डावादरम्यान, ५१ व्या षटकात, अश्विनचा शेवटचा चेंडू बॅटच्या किनाऱ्याला लागत विकेटकीपरच्या हातात गेला, त्यानंतर विराट कोहलीने विकेटचे सेलिब्रेशन केले ते ही पुष्पा स्टाइलंने. विराटच्या या सेलिब्रेशन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चाहते तो सातत्याने शेअर करत आहेत.
(हे ही वाचा: Video: स्मृती मानधनाचा ‘हा’ SIX एकदा बघाच; पाकिस्तानी खेळाडूची प्रतिक्रिया Viral)
(हे ही वाचा: पीव्ही सिंधूचा ‘कच्चा बदाम’ गाण्यावर भन्नाट डान्स, Video Viral)
अल्लू अर्जुनचा प्रसिद्ध चित्रपट ‘पुष्पा द राइज’ च्या या प्रसिद्ध स्टाइलवर विराट किंवा इतर कोणत्याही खेळाडूने सेलिब्रेशन करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही विराट कोहली याच चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ या गाण्याच्या स्टेप्स करताना कॅमेऱ्यात कैद झाला होता. या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर भारतीय संघाने हा सामना एक डाव आणि २२२ धावांनी जिंकला आहे.