भारतात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन दिले जात आहे आणि लोक डिजिटल पेमेंटद्वारे सहजपणे व्यवहारही करत आहेत. भारतीय संस्कृतीत एखाद्या शुभ कार्यक्रमात ढोल वाजवणाऱ्याला शगुन देण्याची परंपरा आहे. दरम्यान, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये ढोल वाजवत असलेल्या माणसाने ‘शगुन’ घेण्यासाठी QR कोड ढोलवर लावला आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शेअर केलेला व्हिडीओ एका लग्न कार्यक्रमाचा आहे ज्यामध्ये ढोलक वाजवला जात आहे आणि लोक आनंदाने नाचताना दिसत आहेत. ढोलकावर एक क्यूआर कोड आहे, जो स्कॅन करून लोक ढोलक वाजवत असलेल्या माणसाला ‘शगुन’ देत आहेत. व्हिडीओमध्ये ‘ये सही है भाई’ असा आवाजही येत आहे. व्हिडीओ शेअर करून अश्विनी वैष्णव यांनी लिहिले की, लग्नात डिजिटल शगुन, डिजिटल इंडियाचा विस्तार!

( हे ही वाचा: नवरदेवाची भन्नाट एन्ट्री! चक्क कुत्र्यासोबत आला बाईकवर बसून, Video व्हायरल)

रेल्वेमंत्र्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे

( हे ही वाचा: Video: दिल्लीतील भररस्त्यात ‘पानी दा रंग’ गाणे गात होता तरुण; अचानक आयुष्मान खुराना त्याच्या समोर आला अन्…)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शेअर केलेला व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून लोक त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले की हा एक शुभ संकेत आहे. हातगाड्या, रस्त्यावरील विक्रेते, बूट पॉलिश, भाजी विक्रेते देखील आता डिजिटल व्यवहार करत आहेत. तर दुसऱ्याने लिहिले आहे की, डिजिटल मतेही घ्या आणि डिजिटल निवडणूक प्रचाराचा प्रसार करा.