scorecardresearch

Video: दिल्लीतील भररस्त्यात ‘पानी दा रंग’ गाणे गात होता तरुण; अचानक आयुष्मान खुराना त्याच्या समोर आला अन्…

काही दिवसांपूर्वी शिवम नावाच्या या गिटार वादकाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आयुष्मान खुरानाचे ब्लॉकबस्टर गाणे ‘पानी दा रंग’ गातानाचा एक व्हिडिओ अपलोड केला होता. हा व्हिडिओ शिवमने अभिनेता आयुष्मान खुरानालाही टॅग केला होता. दरम्यान, त्याची पोस्ट पाहून अभिनेत्याने त्याला नक्कीच भेटू असे आश्वासन दिले होते.

Video: दिल्लीतील भररस्त्यात ‘पानी दा रंग’ गाणे गात होता तरुण; अचानक आयुष्मान खुराना त्याच्या समोर आला अन्…
photo(social media)

Ayushmann Khurrana Singing With Delhi Street Singer: दिल्लीतील एका गिटारवादक स्ट्रीट सिंगरला जेव्हा बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानासोबत गाण्याची संधी मिळाली तेव्हा त्याचा आनंद पाहण्यासारखा होता. खरं तर, काही दिवसांपूर्वी शिवम नावाच्या या गिटार वादकाने आयुष्मान खुरानाचे ब्लॉकबस्टर गाणे ‘पानी दा रंग’ गाताना स्वतःचा एक गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केला होता. हा व्हिडिओ शिवमने अभिनेता आयुष्मान खुरानालाही टॅग केला होता. दरम्यान, त्याची पोस्ट पाहून अभिनेत्याने त्याला नक्कीच भेटू असे वचन दिले होते, त्यानंतर त्याने दिलेले हे वचन पाळत बुधवारी अभिनेता आयुष्मान अचानक दिल्लीतील जॅम सेशनमध्ये शिवमपाशी पोहोचला आणि शिवमला तसेच तिथे उपस्थित असलेल्या लोकांनाही आश्चर्यचकित केले.

आयुष्मान खुरानाने शिवम नावाच्या गिटार वादकासोबत नवी दिल्लीतील जनपथच्या रस्त्याच्या कडेला स्वतःचे गाणे ‘पानी दा रंग’ गाऊन सर्वांची मने जिंकली. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @guitar_boy_shivam नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “वचन पाळल्याबद्दल आयुष्मान धन्यवाद”. आयुष्यमाननेही शिवमच्या पोस्टला उत्तर दिले की, ‘माझे गाणे गायल्याबद्दल आभार! भरपूर प्रेम.’

( हे ही वाचा: Video: भयंकर! चालत्या बसमध्ये चालकाला आला हार्ट अटॅक; नियंत्रण सुटल्याने बस प्रत्येकाला उडवत सुटली अन…)

येथे व्हिडीओ पाहा

( हे ही वाचा: Video: ‘या’ पक्षाची हिंमत तर बघा, चक्क मधमाश्यांच्या पोळ्यावर केला हल्ला अन् तितक्यात…)

व्हायरल होत असलेल्या काही सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये शिवम नावाचा गिटारवादक जनपथ मार्केटमध्ये परफॉर्म करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये आयुष्मान खुरानाही दिसत आहे. व्हिडिओमध्ये आयुष्मानला दिल्लीच्या रस्त्यावर लाइव्ह परफॉर्मन्स करताना पाहून लोकांनी हा परफॉर्मन्स त्यांच्या फोनवर रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून यूजर्स आपल्या प्रतिक्रियांमधून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘आयुष्मान खूप चांगला आहे! तू खूप भाग्यवान आहेस शिवम..

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 12:31 IST

संबंधित बातम्या