Teachers Day 2022: राजस्थानमधील उदयपूर जिल्हा आपल्या सौंदर्यासाठी जगप्रसिद्ध आहे, परंतु त्याच्या सौंदर्यावर सर्वात मोठा डाग आहे तो म्हणजे इथले मानवी तस्करीचे गुन्हे. शेकडो आदिवासी मुलांना येथून नेऊन गुजरातमध्ये नेऊन त्यांना मजुरीची कामे दिली जातात. या गुन्ह्याचा नायनाट करणारा एक शिक्षक सध्या प्रचंड चर्चेत आलाय. या शिक्षकाचा आज म्हणजेच ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी गौरव होत आहे. दुर्गाराम असे या शिक्षकाचे नाव आहे. ते मूळचे नागौरचे रहिवासी असून उदयपूर येथील फलासिया पंचायत समितीच्या सरकारी उच्च प्राथमिक शाळा परगियापाडा शाळेत कार्यरत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राजस्थानच्या दुर्गाराम मुवाल यांना सन्मानपत्र आणि पदक देऊन गौरविण्यात येत आहे. शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे देशभरातील इतर शिक्षकही आहेत. राजस्थानमधील दुर्गाराम यांच्याशिवाय बिकानेर येथील एका महिला शिक्षिकेचाही यात समावेश आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : शिक्षणमंत्र्यांनी सांगितले दारू पिण्याचे फायदे; म्हणतात, “पाणी मिसळून प्यायल्यास औषध बनतं…”

दुर्गाराम म्हणाले की, “मला मुलांना शिकवताना मजा यायची. शिक्षणानंतर ते उदयपूरमधील आदिवासी गावातल्या शाळेत शिक्षक म्हणून शिकवू लागले.” ते म्हणाले की, “अध्यापन सुरू असताना मला असे दिसून आले की, शाळेत नियमित येणारी काही मुले अचानक शाळेत येणं बंद करतात.” त्यांनी तपास केला असता, लहान मुलांना गुजरातच्या सीमेवर नेऊन त्यांना अत्यल्प पैशात १८ तास काम करायला लावल्याचे समोर आले. आर्थिक मजबुरीमुळे ती मुले कोणाला काही बोलूही शकत नव्हती.

दुर्गाराम यांच्या म्हणण्यानुसार, या बाल तस्करीत अनेक मध्यस्थांचा सहभाग होता. त्या मुलांना कोणत्याही परिस्थितीत मध्यस्थांपासून वाचवायचे आहे, असे ते म्हणाले. त्यांनी ठरवले की आपण या समस्येशी लढण्यासाठी काम करू. म्हणूनच त्यांनी सर्वप्रथम पालकांमध्ये शिक्षणाविषयी जनजागृती मोहीम सुरू केली.

आणखी वाचा : स्विमिंग पूलमध्ये बुडत होती आई, १० वर्षाच्या मुलाने असा वाचवला जीव, पाहा VIRAL VIDEO

दुर्गाराम यांनी सांगितले की, २००८ पासून मी अशा घटना रोखण्यासाठी सतत काम करत आहे. जनजागृती मोहिमेत घरोघरी जाऊन पालकांमध्ये शिक्षणाबाबत जनजागृती केल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर त्यांनी स्वतःची इन्फॉर्मर यंत्रणा विकसित करून तस्करीची माहिती घेण्यास सुरुवात केली. ते म्हणाले की, “तेव्हापासून ४०० हून अधिक मुले या नरक जीवनातून मुक्त झाली आहेत आणि त्यांना पुन्हा शिक्षणाशी जोडले गेले आहे, ज्यात २५० हून अधिक मुलींचा समावेश आहे.” त्यांनी गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि राजस्थानच्या विविध जिल्ह्यांतून या सर्व मुलांची सुटका करून घेतली.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : या तरूणाने घागरा आणि स्नीकर्स घालून न्यूयॉर्कच्या रस्त्यावर केला गरबा डान्स

शिक्षक पुढे म्हणाले की, “मानवी तस्करीच्या बहुतांश घटना रात्री घडतात. बहुतांश घटना मी एकट्याने रोखल्या आहेत”. काही प्रकरणांमध्ये त्यांनी पोलिस आणि चाइल्ड हेल्पलाइनची मदत घेतली. ते म्हणाले की, “पूर्वी मी हे काम कोणालाही न सांगता छुप्या पद्धतीने करत होतो, पण नंतर सर्वांना कळले. बालमजुरी आणि बाल तस्करीत गुंतलेल्या मोठमोठ्या टोळ्या आहेत, त्यांची एक मोठी साखळी आहे” ही कामे सोडा नाहीतर हा परिसर सोडून जा आणि जीवे मारण्याच्या धमक्या या टोळ्यांकडून अनेकदा आल्याचे त्यांनी सांगितले. एकदा रात्री २ वाजता २५-३० लोकांनी मला जीवे मारण्याच्या उद्देशाने घेरले, ज्यांचा मी न घाबरता सामना केला. या सर्व घटनांची पर्वा न करता दुप्पट मेहनत घेऊन अशी कामे करू लागलो, असं देखील ते म्हणाले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajasthan saved children from human trafficking will honor teacher of udaipur prp
First published on: 05-09-2022 at 13:30 IST