Animal Movie Impact On Father And Son:: रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट सध्या तिकिटबारीवर अक्षरश: धुमाकूळ घालताना दिसत आहे. रणबीर कपूरची मुख्य भुमिका असलेल्या अॅनिमलची क्रेझ काही संपताना दिसत नाहीये. पण हा चित्रपट अ‍ॅडल्ट प्लस आहे. म्हणजे या चित्रपटात अशी काही दृश्य आहेत जी तुम्हाला विचलित करू शकतात. कदाचित ही दृश्य तुम्ही आपल्या पालकांसोबत पाहिलीत तर तुम्हाला अवघडल्यासारखं होईल. त्यामुळे शक्यतो मित्र-मंडळींसोबत हा चित्रपट पाहा असा सल्ला अनेक समिक्षकांनी दिला आहे. पण तरी देखील काही मुलं आपल्या आई-वडिलांसोबत हा चित्रपट पाहायला गेली. पण विचार करा चित्रपट संपल्यानंतर त्या तरुणांसोबत काय घडलं असेल?

अॅनिमल चित्रपटाचा प्रभाव खऱ्या आयुष्यातही होताना दिसत आहे. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्या व्हिडिओनुसार, अॅनिमल चित्रपट पाहून आल्यानंतर वडिल आणि मुलांमधील दुरावा मिटला आहे, असा दावा करण्यात येत आहे. याच बाप-लेकाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

हा आहे संदीप वांगाच्या चित्रपटाचा परिणाम असं कॅप्शन व्हिडीओला देण्यात आलं आहे. तर व्हिडीओवर असं लिहलं आहे की, अॅनिमल चित्रपट पाहिल्यानंतर एका वडिलांनी दीड वर्षानंतर मुलासोबतची नाराजी दूर केली आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक मुलगा डोळ्यात अश्रू घेऊन त्याच्या वडिलांच्या पाया पडताना दिसत आहे. त्यानंतर त्याचे वडिलही त्याला प्रेमाने मिठी मारताना दिसत आहेत. यावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी दाटलेले दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> वाघाचा थरार! आधी खाली पाडलं मग जबड्यात पकडली मान; थरारक VIDEO व्हायरल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून यावर नेटकऱ्यांनी संमीश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं म्हटलंय. “तुम्हाला खरंच असं वाटतंय का, की ॲनिमल या चित्रपटात बापलेकाच्या नात्यावर भाष्य केलंय? चित्रपटात रणबीर सतत त्याच्या वडिलांचा अपमानच करत असतो”, तर दुसरा म्हणतो “जर मी माझ्या वडिलांना ‘ॲनिमल’ हा चित्रपट दाखवला असता, तर त्यांनी दीड वर्षापर्यंत माझ्याशी अबोला धरला असता”.