Rapper Drake Bra Collection: विविध टीव्ही शोज व जगभरातील म्युजिक ऐकण्याची सोय यामुळे मागील काही वर्षांमध्ये रॅप हा प्रकार अत्यंत प्रसिद्ध झाला आहे. अगदी मराठमोळ्या ढंगातही आता रॅप होऊ लागले आहेत. विशेष म्हणजे या रॅपर मंडळींची फॅन फॉलोईंग सुद्धा तगडी असते. फॅन्स म्हटलं की त्यांच्या प्रेमाला काहीच बंधनं लागू होत नाही. पूर्वी एखाद्या कलाकाराची कलाकृती आवडली की राजे महाराजे त्यांना सोन्याची आभूषणे, नाणी भेट म्हणून द्यायचे. अगदी टोप्या, फेटे उडवून कलेला दाद देण्याची पद्धत काही नवीन नाही पण अलीकडे सगळ्या गोष्टींप्रमाणे कौतुकाची पद्धतही बदलली आहे. कित्येक प्रसिद्ध कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकांमधील महिला स्वतःची ब्रा काढून त्या कलाकारावर फेकत असल्याचे प्रकार याआधी उघड झाले आहेत. प्रसिद्ध रॅपर ड्रेकने त्याच्या परफॉर्मन्सदरम्यान महिलांनी त्याच्यावर फेकल्यानंतर गोळा केलेल्या सर्व ब्रा एका मोठ्या खोलीत ठेवून त्यासह पोज देत असलेला एक फोटो शेअर केला आहे.

ड्रेकने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये तुम्ही त्याच्या मागे १००० हून अधिक रंगीबेरंगी ब्रा पाहू शकता. “आम्ही दोघे विसरलो होतो की मी कोण आहे.. ” अशा आशयाचे कॅप्शन देते त्याने हा फोटो शेअर केला होता. फोटो अपलोड केल्याच्या अवघ्या एका तासात त्याला ५ लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या अकाउंटचे फॉलोवर्सच १२४ मिलियनच्या पुढे आहेत.

दरम्यान, रॅप शो दरम्यान ड्रेकवर महिला ब्रा काढून फेकत असल्याचे याआधीच्या अनेक बातम्यांमधून समोर आलं आहे. स्वतः ड्रेकने सुद्धा याविषयी उघडपणे भाष्य केले आहे. अगदी मागच्याच महिन्यात जेव्हा त्याचा मुलगा अॅडोनिस ग्रॅहम पहिल्यांदा त्याच्या कॉन्सर्टला उपस्थित होता तेव्हा ड्रेकने सर्व चाहत्यांना विनंती केली होती, “कृपया तुमच्या ब्रा तुमच्याकडेच राहू द्या”.

हे ही वाचा<< ‘BRA’ शब्दाचा फुल फॉर्म काय? ब्रा कप साईझचे प्रकार कसे ठरले? तुम्हाला हे माहित होतं का..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय, इट्स ऑल अ ब्लर टूर दरम्यान जुलैमध्ये ड्रेकने कॉन्सर्टमध्येच प्रेक्षकांना म्हटलं होतं की, “आज कोणीच माझ्यावर ब्रा फेकत नाहीये, आजचा शो चांगला होत नाहीये वाटतं” हा एकूण कलेला दाद देण्याचा प्रकार विचित्र वाटत असला तरी ड्रेककडील ब्रा कलेक्शन पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. काहींनी तर त्याला इंस्टाग्रामच्या कमेंट बॉक्समध्ये ब्रा किंग असा टॅग देऊन टाकला आहे.