रक्ताचं पाणी केल्याशिवाय यश मिळणार नाही, काहीही झालं तरी जिद्द अन् चिकाटी सोडायची नाही हे त्याला पक्कं माहिती होतं. त्यामुळे तो त्याचं आयपीएस होण्याचं स्वप्न उराशी बाळगून होता. सभोवताली त्याला त्याच्या ध्येयापासून हटविण्याचे खूपच प्रयत्न सुरु होते. पण तो ऐकेल ते कसला.चहा विकण्यापासून टॉयलेट स्वच्छ करण्यापर्यतची सगळी कामं त्यानं निमूटपणे केली आहेत. कारण एकच त्याला सनदी अधिकारी व्हायचं होतं. यासोबतच त्याला जोडीदाराची साथ मिळाली आणि त्यानं त्याचं स्वप्न सत्यात उतरवलं. तुम्हाला अंदाज आलाच असेल आम्ही कुणाबद्दल बोलतोय. आयपीएस मनोज शर्मां यांचा संघर्ष आणि लव्हस्टोरी दोन्ही 12th fail या चित्रपटातून आपण पाहिली. यानंतर अनेकांचे हे दोघे रोल मॉडेल ठरले. मात्र आता आनंद महिंद्राही त्यांचे फॅन झाले आहेत. आज महिंद्रा अँड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी IPS अधिकारी मनोज शर्मा व त्यांची पत्नी श्रद्धा जोशी यांची भेट घेतली….यानंतर त्यांनी खास ट्विटही केले आहे.

आनंद महिंद्रांनी घेतला मनोज शर्मांचा ऑटोग्राफ

हा सिनेमा अनुराग पाठक यांच्या ’12th fail’ या पुस्तकावर आधारलेला आहे. आयपीएस मनोज शर्मा यांच्या संघर्षाची, जिद्दीची, प्रामाणिकपणाची, चिकाटीची, स्वाभिमानाची आणि अपार कष्टांची हि कथा आहे. आज भेट घेतल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी एक पोस्ट शेअर केली आहे, यामध्ये आनंद महिंद्रा यांनी लिहिले की, ”जेव्हा मी त्यांना त्यांची सही मागितली, तेव्हा ते लाजले. मात्र हीच सही मी तुम्हाला अभिमानानं दाखवत आहे. मनोज कुमार शर्मा, IPS आणि त्यांची पत्नी श्रद्धा जोशी, IRS, हे खरे वास्तविक जीवनातील हिरो आहेत. #12thFail हा चित्रपट यांच्याच जीवनावर आधारीत आहे. ”

त्यांना भेटल्यामुळे मी आज एक श्रीमंत माणूस आहे.”

ते पुढे म्हणतात, ’12th fail’ चित्रपटाची कथा IPS अधिकारी मनोज शर्मा व त्यांची पत्नी श्रद्धा जोशी यांच्या आयुष्याशी तंतोतंत जुळत आहे. दोघेही त्याच जिद्दीनं जगत आहेत. भारताला जागतिक महासत्ता बनवायचे असेल, तर अधिकाधिक लोकांनी असं जगायला हवं, हेच या देशाचे खरे सेलिब्रिटी आहेत. त्यांना भेटून आज मी आणखीच श्रीमंत झालो.”

पाहा पोस्ट

हेही वाचा >> आनंद महिंद्रा ‘या’ स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक! तुम्हीही करू शकता सुरुवात, पाहा Video

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“अधिकाधिक लोकांनी त्यांची जीवनशैली अंगीकारली तर तमाम भारतीयांचे महासत्ता बनण्याचे स्वप्न लवकर साकार होईल.” शेवटी असंही ते म्हणाले