Lion In Grocery Store Video Viral : हल्ली प्रत्येकालाच कष्टात शॉर्टकट शोधायला आवडतोय, झटपट यश मिळवण्यासाठी परिश्रम घेण्याची हल्ली कोणाची इच्छा दिसत नाही, पण असा विचार फक्त मनुष्यचं नाही तर प्राणीसुद्धा करताना दिसतायत. त्यामुळे शिकार करण्यातही ते काहीतरी शॉर्टकट शोधतायत. असाच शॉर्टकट जंगलाचा राजाने शोधलाय. सध्या सोशल मीडियावर एका सिंहाचा थरारक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, ज्यात तो चक्क एका दुकानात शिरून मांसाच्या तुकड्यांवर ताव मारताना दिसतोय. यानंतर दुकानात असा काही गोंधळ निर्माण होतो की पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
सिंह तुम्हाला एखाद्या दुकानात दिसला तर!…
सिंह जंगलातील सर्वात बलाढ्य प्राणी आहे, जो हत्तीच काय कोणताही प्राणी समोर येवो, ज्याची एका झटक्यात शिकार करतो. त्यामुळेच त्याला जंगलाचा राजा म्हटले जाते. पण, हाच सिंह तुम्हाला एखाद्या दुकानात दिसला तर! हे वाचून तुम्हाला थोडं विचित्र वाटेल आणि हसायलाही येईल, पण खरंच एका दुकानात सिंह रेडिमेड शिकार खाताना दिसतोय. ही घटना दक्षिण आफ्रिकेतील एका किराणा दुकानात घडल्याची माहिती दिली जात आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक सिंह किराणा दुकानात बिनधास्तपणे प्रवेश करतो आणि थेट मांस ठेवलेल्या फ्रिजपर्यंत पोहोचतो. यावेळी फ्रिजमध्ये ठेवलेले मांसाचे पॅकेट फोडून तो खायला सुरुवात करतो. तो एक एक करून अनेक पॅकेट्स फोडतो आणि खायला सुरुवात करतो. यावेळी दुकानात आलेले ग्राहक जेव्हा मांस घेण्यासाठी फ्रिजजवळ येतात तेव्हा तिथे सिंहाला पाहून ते घाबरून सैरावैरा पळू लागतात. पण, सिंह मात्र मांस खाण्यात व्यस्त असतो. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पण, हा सिंह इथे कसा आणि कुठून आला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
या व्हिडीओतून एका गोष्टीची जाणीव होते की, माणसाने आपल्या स्वार्थापोटी केलेल्या जंगलतोडीमुळे प्राण्यांना हे दिवस पाहावे लागत आहेत. जंगलाच्या राजाला आता भूक भागवण्यासाठी मानवी वस्तींमध्ये शिरावे लागत आहे.
सिंहाचा हा व्हिडीओ @wildtrails.in नावाच्या इ्न्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट कारण्यात आला आहे, जो आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आणि त्यावर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, “सिंहपण रेडिमेड शिकार करतो.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कोणीतरी त्याला पॅकेटवरील प्लास्टिक काढायला मदत केली असेल असे मला वाटते.” दरम्यान, अनेकांनी हा एआय जनरेटेड व्हिडीओ असल्याचा दावा केला आहे.