Indore Retired Army Man Death Video : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक मनाला चटका लावणारा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही हळहळ व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही. मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये एका योगा केंद्रात देशभक्तीपर कार्यक्रमात एका निवृत्त भारतीय जवान आनंदाने नाचत होता. मात्र, नाचता नाचता ते जमिनीवर कोसळले आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. योगा केंद्रात लोकांसमोर हातात तिरंगा घेऊन नाचत असताना त्यांना मृत्यूने गाठले; पण बराच वेळ ही सगळ्यांना सुन्न करून टाकणारी बाब कुणाच्या लक्षातही येत नाही. मन हेलावणाऱ्या या घटनेचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये एक निवृत्त भारतीय जवान हातात तिरंगा घेऊन रंगमंचावर आपली अदाकारी सादर करताना दिसत आहे. अचानक रंगमंचावरच त्यांना हृदयविकाराचा झटका येतो आणि ते तेथेच अडखळत खाली कोसळतात. त्यांच्या हातातून तिरंगा पडतो; पण लोक हा त्यांच्या अदाकारीचा भाग मानून टाळ्या वाजवत राहतात. बराच वेळ ते रंगमंचावर तसेच पडून राहतात तेव्हा लोकांना सत्य समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, परफॉर्मन्स करणाऱ्या निवृत्त जवानाचे नाव बलविंदर सिंह छाबरा (वय ७३) असे आहे. ते इंदूरच्या फुटी कोठीमधील एका योगाशी संबंधित कार्यक्रमात सिंगल परफॉर्म करीत होते. निवृत्त सैनिक बलविंदर सिंह छाबरा यावेळी आपल्या परफॉर्मन्सदरम्यान माँ तुझे सलाम हे गात होते आणि हाताने तिरंगा झेंडा फडकवत होते. गाताता ते नाचण्याचा आनंद घेत होते. पण परफॉर्म करताना अचानक ते बेशुद्ध झाले आणि रंगमंचावर कोसळले. यावेळी त्यांच्या हातातून ध्वज खाली पडला. मंचावर तिरंगा पडल्यावर दुसऱ्या व्यक्तीने तो उचलला आणि तो फडकवू लागला. पण सैनिक बलवीर सिंह छाबडा रंगमंचावर कोसळले तरी उपस्थित लोक टाळ्या वाजवत राहिले. कारण अनेकांना हा त्यांच्या परफॉर्मन्सचाच भाग आहे, असे वाटले. पण बराच वेळ ते उठत नसल्याने रंगमंचावरच्या एका व्यक्तीने त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला; पण त्यानंतरही त्यांनी काहीच हालचाल केली नाही, तेव्हा लोकांना संशय आला.

रिल्सचा नाद! तरुणी सिलिंडरवर उभी राहून लागली नाचू, नंतर पुढे जे घडले ते पाहून तुम्हालाही येईल हसू; पाहा VIDEO

निवृत्त सैनिक बलवीर सिंह छाबडा यांना तत्काळ सीपीआर देण्यात आला; पण तरीही ते न उठल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पण, त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. डॉक्टरानी हा सायलेंट हार्टअटॅक असल्याचे सांगितले. दरम्यान, त्यांच्या मृत्यूच्या घटनेचा एक लाइव्ह व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.