Shocking Video: सध्या चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. रात्रीची वेळ बघून चोर घरात घुसून चोरी करू लागले आहेत. तर कधी रेल्वेमध्ये पाकीटमार, दुकानात चोरी करणाऱ्या चोरांची दहशत वाढू लागली आहे. अगदी कसलीच पर्वा न करता, हे चोर हातचलाखीने चोरी करून दुसऱ्याचं नुकसान करून निघून जातात. अनेकदा यांच्यावर कारवाई होते; पण अनेकदा काही चोर हाताला लागत नाहीत आणि असं कृत्य पुन्हा पुन्हा करीत राहतात.

सोशल मीडियावर अशा चोरीच्या घटनांशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. सध्या चोरीची अशीच एक घटना घडलीय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडीओ (Robbery Video Viral)

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक माणूस रात्रीच्या वेळी महिलांचे कपडे घालून एका घराबाहेर फिरताना दिसतोय. अशाच प्रकारे महिलांचे कपडे घालून या माणसाने चोरी बोरिवली, कांदिवली, मालाडच्या परिसरात चोरी केल्याचं व्हिडीओमधून लक्षात येतंय.

या चोरट्याचा शोध पोलिसांनी घेतला असून त्याने चोरी केलेले दागिने रोखरक्कम जप्त केली आहे, आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. मालाड पोलिसांनी या चोरट्याला पकडलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरट्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @vistanewsmarathi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल तीन लाखापेक्षा जास्त आले आहेत. तसंच “मालाड, कांदिवली, बोरिवलीमध्ये महिलांचे कपडे घालून करायचा चोरी” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “तुम्ही त्याला जामिनावर सोडाल आणि तो पुन्हा मोठ्या प्रमाणात लोकांना लुटेल आणि आरोप लपवण्यासाठी राजकारणात सामील होईल. किमान जाणीवेसाठी गुन्हेगाराचा चेहरा तरी दाखवा.” तर दुसऱ्याने “चेहरा का लपवलाय कसं ओळखणार” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “खूप उत्कृष्ट काम केलं आहे मालाड पोलिसांनी, जय हिंद”