Viral video: साप म्हटलं तरी अंगावर काटा येतो. साप असा एक खतरनाक प्राणी आहे कि त्याच्या एका चाव्याने माणसाचा जागीच मृत्यू होऊ शकतो.जगात अनेक विषारी साप आहेत.ज्यांच्यापासून लांब राहणं केव्हाही चांगलं.तुम्ही आतापर्यंत सापांचे अनेक व्हिडीओ पहिले असतील, तसेच अजगराचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अजगर हा जगातील असा प्राणी आहे, जो स्वतःपेक्षा मोठ्या प्राण्यांनाही गिळू शकतो. जर कुणी अजगराच्या तावडीत सापडलं तर त्याची सूटका होणे सगळ्यात अवघड असतं. असाच एक महाकाय अजगर नवी मुंबईतल्या रस्त्यावर आढळला, यानंतर सर्पमित्रांनी अजगराला पकडलं असून त्याचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा महाकाय अजगर पाहून तुमचाही थरकाप उडेल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, भर रस्त्यात पावसाचं पाणी साचलं आहे. आणि यात पावसात अजगर दिसत आहे, हिरव्या रंगाचा विषारी अजगर पाण्यातून तोंड वर काढताना दिसत आहे. आता विचार करा की या पाण्यात आपण चालतोय आणि चुकून अजगरावर पाय पडला तर काय होईल…नक्कीच साप चावणार. या अजगराला पाहून लोकही घाबरले असून रस्त्याच्या कडेला थांबलेले दिसत आहेत. यावेळी सर्पमित्रांनी मोठ्या चलाखीनं अजगराला नाल्यातून बाहेर काढलं आहे. यावेळी हा अजगर आक्रमक होत हल्ला करतानाही दिसत आहे. मात्र सर्पमित्रांनी त्यांचं काम चोख केलं आहे.
पावसाचं पाणी बिळात शिरल्यानंतर सरपटणारे प्राणी बाहेर येतात. यात सापांचाही समावेश असतो. ओल्या ऐवजी कोरड्या जागेत राहणे साप पसंत करतात. त्यामुळं पावसाळ्यात साप बिळाबाहेर पडून आपल्या सोयीची जागा शोधण्याचा प्रयत्न करतात. पावसाळ्याच्या दिवसांत साप निघण्याचं प्रमाण बरंच वाढत असतं.पावसाळ्यात दरवर्षी सर्पदंशानं अनेक लोकांचा मृत्यू होतो.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ sarpmitr_ashtvinayak_more नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
पावसाळा सुरू झाल्यापासून जवळपास हिवाळा संपेपर्यंत काळजी व खबरदारी घेणे आवश्यक आहे. सर्पदंश टाळण्यासाठी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. सर्पदंश झाल्यावर वेळेवर उपचार न मिळणे, दवाखाण्यात जाण्यासाठी वाहन न मिळणे, दवाखाना लांब असणे, दवाखान्यात सर्पदंशावरील लस उपलब्ध नसणे, अशा कारणांनी नागरिकांना सर्पदंशानंतर आपले प्राण गमवावे लागतात. त्यामुळं पावसाळ्याच्या काळात शेतकरी आणि विशेत: ग्रामीण भागातील नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.