Royal enfield classic 650: रॉयल एनफिल्डनं EICMA २०२५ मध्ये जबरदस्त एन्ट्री घेतली आहे. कंपनीला १२५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी अनेक नवीन बाइक्स दाखवल्या. यात नवीन बुलेट ६५०, क्लासिक ६५०, १२५ व्या वर्धापन दिनाचं स्पेशल एडिशन, हिमालयन मॅना ब्लॅक, लिमिटेड एडिशन शॉटगन ६५०, आणि नवीन फ्लाइंग फ्ली स्क्रॅम्बलर या बाइक्सचा समावेश होता. त्यासोबतच रॉयल एनफिल्डनं हिमालयन ७५० ची एक झलक (teaser) पण दाखवली, पण तिची सगळी माहिती अजून गुप्त ठेवली आहे.
क्लासिक ६५०
आपल्या १२५ वर्षांच्या मोठ्या टप्प्याचं सेलिब्रेशन करण्यासाठी रॉयल एनफिल्डनं क्लासिक ६५० चं स्पेशल १२५वी अॅनिव्हर्सरी एडिशन सादर केलं आहे.या बाइकमध्ये मेकॅनिकल म्हणजे इंजिन किंवा परफॉर्मन्समध्ये काही बदल नाहीत, पण तिचा लुक खूप खास बनवला आहे. बाइकमध्ये लाल रंगावर सोनेरी “१२५ वर्षे ” चिन्ह दिलं आहे. तिचा टिअर-ड्रॉप शेपचा फ्युएल टँक खास “हायपेरशिफ्ट” पेंटने रंगवला आहे, जो प्रकाशात रंग बदलतो आणि त्यामुळे बाईकला एक सुंदर, चमकदार आणि वेगळा लूक मिळतो.
हिमालयन ४५० माणा ब्लॅक एडिशन
हिमालयन माणा ब्लॅक ही बाईक माणा पासच्या खडतर डोंगराळ रस्त्यांना श्रद्धांजली म्हणून बनवली गेली आहे. ही बाईक म्हणजे हिमालयन ४५० चाच एक ऑल-ब्लॅक, स्टायलिश व्हर्जन आहे. तिचा लूक पूर्ण काळा असून ती आणखी मजबूत आणि ऑफ-रोड रायडिंगसाठी सोयीस्कर बनवली आहे.या बाईकमध्ये फॅक्टरी-फिटेड अॅडव्हेंचर गिअर दिलं आहे – जसं की काळे रॅली-स्टाइल हँडगार्ड्स, रॅली सीट, उंच फ्रंट फेंडर आणि ट्यूबलेस स्पोक्ड व्हील्स.बाईकमध्ये 452cc लिक्विड-कूल्ड सिंगल सिलिंडर इंजिन आहे, जे 40hp पॉवर आणि 40Nm टॉर्क तयार करतं. यात 6-स्पीड गिअरबॉक्स आणि असिस्ट-आणि-स्लिपर क्लच आहे, ज्यामुळे वेगवेगळ्या रस्त्यांवर बाईक चालवताना स्मूथ परफॉर्मन्स मिळतो

रॉयल एनफिल्ड बुलेट ६५०
या वर्षीचं एक मोठं आकर्षण म्हणजे बुलेट ६५०. ही बाईक पारंपरिक बुलेटचा लूक ठेवत आधुनिक इंजिन आणि टेक्नॉलॉजीसोबत आली आहे.बाईकमध्ये हँड-पेंटेड पिनस्ट्राइप्स, क्लासिक फ्युएल टँकवरील बुलेटचं चिन्ह, नवीन हेडलॅम्प डिझाइन आणि ताज्या रंगांचे पर्याय दिले आहेत.ही बाईक स्टील ट्युब्युलर चेसिसवर तयार केली आहे, आणि त्यात 647cc पॅरलेल-ट्विन इंजिन आहे, जे 46hp पॉवर आणि 52Nm टॉर्क निर्माण करतं. पुढच्या चाकाला 320mm डिस्क ब्रेक आणि मागच्या चाकाला 300mm डिस्क ब्रेक दिला आहे, ज्यामुळे ब्रेकिंग खूप सुरक्षित आणि स्थिर होते. या बाईकला पुढे १९-इंचाचं आणि मागे १८ -इंचाचं चाक आहे, ज्यामुळे ती चालवताना बॅलन्स आणि कम्फर्ट दोन्ही मिळतात.
लिमिटेड एडिशन शॉटगन ६५० x रफ क्राफ्ट्स
रॉयल एनफिल्डनं तैवानच्या रफ क्राफ्ट्स नावाच्या कस्टम बाईक कंपनीसोबत मिळून एक खास बाईक तयार केली आहे – शॉटगन ६५० x रफ क्राफ्ट्स. ही बाईक फक्त १०० युनिट्समध्येच उपलब्ध असणार आहे आणि प्रत्येक बाईकला वेगवेगळा क्रमांक (नंबर) दिला जाणार आहे.ही बाईक “कॅलिबर रोयाल” या खास कस्टम मॉडेलनं प्रेरित आहे. तिचा लूक खूपच रॉयल आहे – ग्लॉस आणि मॅट ब्लॅक ड्युअल-टोन फिनिश, त्यावर सोनेरी रेषा, हँड-कास्ट केलेले ब्रासचे टँक बॅजेस, आणि क्विल्टेड लेदर सीट्स दिल्या आहेत.बाईकमध्ये आणखी आकर्षक गोष्टी म्हणजे गोल्ड फोर्क ट्यूब्स, अॅलॉय व्हील्सवर कॉन्ट्रास्ट कट डिझाइन, आणि बार-एंड मिरर. प्रत्येक बाईकसोबत रफ क्राफ्ट्सने साईन केलेलं एक खास आर्ट प्रिंट देखील मिळेल. ही लिमिटेड एडिशन बाईक भारत, युरोप, उत्तर अमेरिका आणि आशिया-पॅसिफिक या निवडक बाजारांमध्ये उपलब्ध होईल.
फ्लाइंग फ्ली स्क्रॅम्बलर FF.S6
रॉयल एनफिल्डची जुनी फ्लाइंग फ्ली नावाची बाईक आता इलेक्ट्रिक अवतारात परत आली आहे – नाव आहे FF.S6 इलेक्ट्रिक स्क्रॅम्बलर.ही बाईक शहरात आणि हलक्या ऑफ-रोड राइडिंगसाठी बनवली गेली आहे. तिचं चेसिस हलकं आहे, आणि त्यात USD फ्रंट फोर्क्स, डिस्क ब्रेक्स, आणि पुढे १९-इंचाचं, मागे १८-इंचाचं चाक आहे.या ई-बाईकमध्ये हाय-टॉर्क इलेक्ट्रिक मोटर आहे, जी मॅग्नेशियम बॅटरी केसमध्ये बसवलेली आहे – त्यामुळे वजनाचा बॅलन्स चांगला मिळतो.तिच्यात अनेक आधुनिक फिचर्स आहेत – गोल TFT टचस्क्रीन डिस्प्ले, 4G, ब्लूटूथ आणि वाय-फाय कनेक्टिव्हिटी, व्हॉइस असिस्टन्स, आणि ड्युअल-चॅनेल ABS जे बंद/चालू करता येतं.ही बाईक २०२६ च्या शेवटी लॉन्च होणार आहे, आणि तिची किंमत व इतर माहिती नंतर जाहीर केली जाईल.
