युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा व्लादिमीर पुतिन यांनी केल्यापासून त्याच्याविरोधात जगभरात आंदोलने केली जात आहेत. रशियामध्येही मोठ्या प्रमाणात पुतिन यांनी शेजारच्या देशावर चढवलेल्या हल्ला फारसा लोकांना पटलेला नाही. त्यामुळेच रशियामधूनही पुतिन यांना विरोध केला जातोय. याच विरोधाचा एक अजब नमुना नुकताच एका रशियन उद्योजकाच्या पोस्टमधून पहायला मिळाला.

नक्की वाचा >> Ukraine War: पुतिन यांचा मोदींना कॉल, रशियाने केला धक्कादायक दावा; म्हणाले, “युक्रेननेच भारतीय…”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या रशियन उद्योजकाने पुतिन यांना जिवंत अथवा मृत अवस्थेत आपल्या समोर आणणाऱ्यास १ मिलियन अमेरिकन डॉलर्स (साडेसात कोटी रुपये) देण्याची ऑफर दिलीय. पुतिन यांना जिवंत अवथा मृत पकडून आणणाऱ्याला बक्षीस देण्याची ही ऑफर अ‍ॅलेक्स कोनानिखिन या उद्योजकाने दिलीय.

नक्की पाहा >> देशाचं नाव चुकीचं घेतल्यानं नारायण राणे ट्रोल; मुंबई विमानतळावरील व्हिडीओ झाला व्हायरल

लिंक्डइनवर अ‍ॅलेक्स यांनी एक पोस्ट केली असून त्यामध्ये त्यांनी ही ऑफर दिलीय. माजी बँकर असणाऱ्या अ‍ॅलेक्स यांनी लवकरच पुतिन यांना ताब्यात घेतलेलं पहायला मिळो अशी इच्छाही पोस्टमध्ये व्यक्त केलीय. युक्रेन युद्धानंतर पुतिन यांना ताब्यात घेतल्याचं चित्र दिसायला हवं असं अ‍ॅलेक्स म्हणालेत. “रशियन तसेच आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार कारवाई करत जो अधिकारी पुतिन यांना युद्धकैदी म्हणून अटक करेल त्याला मी १० लाख अमेरिकन डॉलर्स देईल असं आश्वासन देतो,” असं अ‍ॅलेक्स यांनी म्हटलंय.

नक्की वाचा >> Ukraine War: मोठी बातमी! पुतिन यांनी Nuclear Attack च्या भीतीने आपल्या कुटुंबियांना…

“पुतिन हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष नाहीत कारण ते विरोधकांची हत्या करुन या पदावर आलेत. एका विशेष मोहिमेमध्ये रशियातील इमारती बॉम्बने उडवून त्यांना कायद्याचं उल्लंघन करत, मुक्त निवडणूक न घेता पद मिळवलंय,” असंही अ‍ॅलेक्स म्हणालेत. “पुतिन यांच्या गुंडांनी युक्रेनमध्ये सुरु केलेल्या संहाराच्या कालावधीमध्ये मी युक्रेनला समर्थन करत आहे. मी यापुढेही समर्थन करत राहिलं,” असं अ‍ॅलेक्स यांनी म्हटलंय.

नक्की वाचा >> Ukraine War: “पंतप्रधान मोदी हिंमत दाखवून पुतिन यांना…”; भाजपा खासदाराने निशाणा साधत विचारला प्रश्न

अ‍ॅलेक्स यांच्या पोस्टमध्ये पुतिन यांचा फोटोही आहे. या फोटोवर मध्यभागी पुतिन यांचा चेहरा असून त्याखाली, ‘वॉण्टेड : डेड ऑर अलाइव्ह… फॉर वॉर क्राइम्स’ असा मजकूर लिहिलाय. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर डिलीट करण्यात आली असली तरी त्याचे स्क्रीनशॉर्ट व्हायरल झालेत.

नक्की वाचा >> Ukraine War: “एका व्यक्तीच्या इगोमुळं संपूर्ण जगाला त्रास सहन करावा लागतोय, लोकशाही टिकवणं हे…”

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने यापूर्वीच रशियाविरोधात युद्धखोरीचा खटला चालवता येईल का याची चाचणी सुरु केलीय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Russian entrepreneur alex konanykhin has put a 1 million usd bounty on vladimir putins head scsg
First published on: 03-03-2022 at 14:13 IST