हिंदु धर्मात भगवान शंकराला आराध्य मानले जाते. भगवान शिव हे हिंदू त्रिमूर्तींपैकी एक देव आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना त्रिमुर्ती म्हटले जाते.
भारतीय संस्कृतीत भगवान शिवाच्या पूजेला खूप महत्त्व आहे. त्यांचे चिंतन करणे, त्यांच्या नावाचा जप करणे, त्यांच्या मंदिरांना भेट देणे या सर्व गोष्टी भक्त मनापासून करतात. त्याचप्रमाणे हिंदू धर्मात नागदेवतेलाही महत्त्व आहे. भगवान शंकर आपल्या गळ्यात नाग धारण करतात. त्यामुळे भगवान शंकराचे भक्त नागदेवतेची पुजा देखील करतात. भारतात नागपूजा आणि नागपंचमी या सणांना खूप महत्त्व दिले जाते. नागपंचमीच्या दिवशी लोक नाग मंदिरात जाऊन नाग देवतेची पूजा करतात आणि दूध अर्पण करतात किंवा वारुळाची पुजा करतात. दरम्यान सध्या सोशल मीडियावर अशाच प्रकारे नागदेवतेची पुजा करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे व्हिडीओमध्ये लोक चक्क जीवंत नागाची पुजा करत आहे. व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

हेही वाचा – Viral Vada Pav Girl चंद्रिका दीक्षितच्या अटकेबाबत दिल्ली पोलिसांनी केला खुलासा! वाचा, व्हायरल व्हिडीओचे सत्य

व्हायरल व्हिडीओ इंस्टाग्रामवर omkar_sanatanii नावाच्या पेजवरून पोस्ट केला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते आहे की, “घरातील मंडळी पुजेला बसलेली आहे. गुरुजी पुजेजे मंत्र म्हणत आहे. सर्वांच्या मध्ये एका चोरांवर एक मोठ्या परातमध्ये चक्क जीवंत नाग दिसत आहे. पुजेला बसलेले जोडपे नागदेवतेला एका भांड्याने दूध अर्पन करताना दिसत आहे. गुरुजी परातीच्या मधोमध ठेवलेली मुर्ती हाताने उचलून जोडप्याला देत आहे. त्यानंतर त्यांच्या हातातील पात्रामध्ये एका छोट्या गडूने दुध ओतत आहे. तेवढ्यात नाग फुत्कारत फणा काढतो हे पाहून सर्वजण घाबरतात. गुरजी आणि पुजा करणारे जोडपे थोडे मागे सरकून बसतात.”

हेही वाचा – भररस्त्यात पार्क केली बाईक, खुर्ची टाकून आरामात बसला; रील बनवणाऱ्याला पोलिसांनी अशी घडवली अद्दल

व्हायरल व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला असून लाखो लोकांनी पसंती दर्शवली आहे. व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत आश्चर्य व्यक्त केले आहे. एकाने लिहिले, “प्राण्यांना त्रास का देता” आणखी एकाने लिहिले, मुख्या प्राण्यांना त्रास का देता.