आपल्यापैकी बरेच जण रिक्षाने प्रवास करतात. अनेकांसाठी रिक्षा म्हणजे फक्त वाहतूकीचा पर्याय आहेत पण काही लोक असे आहेत ज्यांच्या लहाणपणीच्या आठवणी रिक्षाबरोबर जोडलेल्या आहेत. आपल्यापैकी अनेकांनी लहानपणी शाळेत रिक्षाने प्रवास केला आहे. रिक्षामधील प्रवासाच्या गंमती जमंती प्रत्येकाच्या मनात साठलेल्या असतील. प्रत्येकाचे रिक्षावाले काका ठरलेले असतात. रोज वेळेत शाळेत घेऊन जाणारे आणि शाळेतून पुन्हा घेऊन येणारे काका सर्वांनाच अजूनही लक्षात असतील. तुम्हाला रोज सुखरूपपणे शाळेत सोडणाऱ्या आणि पुन्हा शाळेतून घरी सुरक्षितपणे सोडणाऱ्या रिक्षावाल्या काकांचे तुम्ही आभार व्यक्त केले आहेत. आपण कधी असा विचारही केला नसेल. पण एका तरुणीने तिला रोज शाळेत सोडणाऱ्या काकांचे हटके पद्धतीने आभार व्यक्त केले आहे. तरुणीने काकांना एक खास भेट दिली आहे जे पाहून काकांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसत आहे त्याचे वर्णन शब्दात करता येणार नाही.

हेही वाचा – बापरे! घरात चक्क जिवंत नागाची पुजा करतायेत हे लोक, पाहा Viral Video

कन्टेंट क्रिएट जोईने Instagram वर शेअर केलेल्या व्हिडिओने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. व लेबर डे निमित्त जॉयने शाळेत असल्यापासून रोज घरी सोडणाऱ्या रिक्षाचालकाचे आभार व्यक्त करते. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की, रिक्षामध्ये प्रवास करताना तिच्या असे लक्षात आले की रिक्षा चालवणाऱ्या काकांकडे पाण्याची चांगली बाटली नाही. ते खराब झालेल्या प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पित आहेत. त्यामुळे तीने काकांना पाण्याची बाटली भेट देण्याचे ठरवते. काकांना नवी कोरी स्टीलची पाण्याची बाटली देऊन कृतज्ञता व्यक्त करते. तिची साधी कृती काकांच्या चेहऱ्यावर आनंद घेऊन येते. छोटीशी भेट मिळाल्यानंतर काकांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि हास्य अनमोल आहे.

हेही वाचा – काय सांगता! इराणमध्ये पडला चक्क माशांचा पाऊस? आकाशातून खाली पडणाऱ्या माशांचा Video Viral

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. लोकांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला असून लोक जोयीचे कौतूक करत आहे. काकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे. अनेकांनी जोयीचे आभार व्यक्त केले आहेत. काहींनी माणुसकी अजूनही जिवंत आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.