माशांचा पाऊस ही एक आश्चर्यकारक घटना आहे. सोमवारी यासुज परिसरात मुसळधार पाऊस पडत असताना इराणमध्ये ही दुर्मिळ घटना घडली आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहेत आणि नेटकरी व्हिडीओ पाहून अवाक् झाले आहे.

एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये अनेक मासे आकाशातून खाली पडत आहेत. ‘माशाचा पाऊस’ चित्रित करणारा माणूस – आनंदाने उड्या मारताना दिसतो. व्हिडिओ शेअर करताना, एक्स मारियो नॉफल (@MarioNawfal) यांनी लिहिले, “असामान्य घटना. चक्रीवादळामुळे समुद्रातून मासे आकाशाकडे गेले जे पावसाबरोबर पुन्हा जमिनीवर आले, ज्याला माशांचा पाऊस म्हटले जात आहे.”

दुसऱ्या युजरने तोच व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, “अचानक… इराणमध्ये माशांचा पाऊस पडला. इराणच्या यासुज शहरात पाऊस पडल्यानंतर हा प्रकार घडला आणि त्यानंतर शहरातील रस्त्यावर असलेल्या रहिवाशांच्या अंगावर अचानक मासे पडले. याचे कारण अद्याप कळलेले नाही.”

हेही वाचा – भररस्त्यात पार्क केली बाईक, खुर्ची टाकून आरामात बसला; रील बनवणाऱ्याला पोलिसांनी अशी घडवली अद्दल

X वर पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. २.२ दशलक्षपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. व्हायरल व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने विनोद केला, “क्षेपणास्त्रांचा वर्षाव करण्याऐवजी, इस्रायलने मासे पाठवल्यासारखे वाटते.” दुसऱ्या युजरने लिहिले, “महासागराने इराणच्या लोकांना आज रात्रीचे जेवण दिले आहे.”

हेही वाचा – “मी तुम्हाला ५०० डॉलर देतो, तुम्ही मला नोकरी द्या”; तरुणाने थेट स्टार्टअप च्या फाउंडर्सला दिली भन्नाट ऑफर

इराण इंटरनॅशनलच्या मते, मुसळधार पावसामुळे देशातील २१ भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. इराणच्या हवामान संस्थेने रविवारपासून पावसाची नवीन लाट सुरू होऊन इतर भागात पसरण्याचा इशारा दिला आहे. पूर्व अझरबैजानमधील शबेस्टार काउंटी हा सर्वात जास्त प्रभावित प्रदेशांपैकी एक आहे.