Bollywood Singer KK Died: प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच ‘केके’चं मंगळवारी रात्री कोलकात्यामध्ये निधन झालं आहे. कोलकात्यामध्ये लाइव्ह कॉन्सर्टदरमध्ये अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. रुग्णालयात दाखल करण्यापुर्वीच त्याचं रात्री १० वाजून ४५ मिनिटांनी निधन झालं. तो ५३ वर्षांचा होता. विशेष म्हणजे तासाभरपूर्वी कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमोर गाणारा केके अचानक आपल्याला सोडून गेल्याच्या गोष्टीवर चाहत्यांचा विश्वास बसत नाहीय. काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बुधवारी कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला.

नक्की वाचा >> विश्लेषण : ‘नव्वद’ची पिढी नि ‘केके’चे गारूड… काय होते हे समीकरण?

“कृष्णकुमार कुन्नाथ, ज्याला प्रेमाने केके म्हणून ओळखले जाते. तो भारतीय संगीत इंडस्ट्रीमधील सर्वात अष्टपैलू गायकांपैकी एक होता. त्याच्या मधूर आवाजाने आम्हाला अनेक अविस्मरणीय गाण्यांचा आनंद दिला. काल रात्री त्याच्या आकस्मिक निधनाची बातमी समजल्यानंतर फार दु:ख झालं. माझ्या सहवेदना त्याच्या कुटुंबियांना आणि जगभरातील चाहत्यांसोबत आहेत.” राहुल गांधींनी ट्विट केले.

(हे ही वाचा: मृत्यूच्या काही वेळ आधीच ‘केके’ने Instagram वरुन पोस्ट केलेले दोन फोटो; कॅप्शनमध्ये म्हणाला होता, “आज रात्री…”)

केके कोलकात्यामधील एका कॉलेजमध्ये नाझरुल मंचच्या कार्यक्रमात गात असतानच त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे तो त्याच्या हॉटेल रुममध्ये परतला. मात्र त्याची प्रकृती खालावल्यानंतर त्याला कोलकात्यामधील सीएमआरआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याला रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्याला ब्रॉट डेड म्हणजेच रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला, असं घोषित केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केकेसोबत घडलेल्या या साऱ्या प्रकारच्या काही वेळ आधीच त्याने इन्स्टाग्रामवरुन या कार्यक्रमातील फोटो शेअर केले होते.