आज देशभरात राम नवमीचा उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी प्राचीन राम मंदिरांमध्ये श्रीराम जन्माचा उत्सव पार पडला. राज्यातही राम नवमीनिमित्त ठिकठिकाणच्या राम मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली आहे. अनेक कलाकारांनी हटके अंदाजात राम नवमीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. कुणी रांगोळीतून, कुणी सुंदर चित्रातून तर कुणी गाणं गाऊन रामनवमीच्या शुभेच्छा दिल्यात. दरम्यान श्रीराम जन्माच्या उत्सावानिमित्त सुप्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनाईक याने श्री प्रभू रामाचं सूंदर वाळूशिल्प साकारलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रामनवमीच्या शुभ मुहूर्तासाठी तयार केलेल्या त्याच्या वाळूच्या कलेची झलक कलाकाराने शेअर केली. ओडीशा येथील समुद्र किनाऱ्यावर वाळुपासून हे वाळुशिल्प पट्टनाईक यांनी तयार केले आहे. त्यानं ट्विटरवर भगवान रामाच्या विस्तृत वाळूच्या शिल्पाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. अयोध्येत निर्माण होत असलेले राममंदिरही या शिल्पात दाखवण्यात आले आहे. हे वाळूशिल्प पाहण्यासाठी पर्यटक देखील भेट देत आहेत.

पाहा पोस्ट –

हेही वाचा- Video: पूजा सुरु असतानाच भाविक पडले 50 फूट खोल विहिरीत; अनेकजण थेट…

या पोस्टला आतापर्यंत २१ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून ही कलाकृती अनेकांच्या पसंतीस उतरली आहे. चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजले गेलेले श्री राम यांचा जन्म झाला, अशी मान्यता आहे. हा दिवस श्री रामनवमी म्हणून साजरा करतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sand sculpture for ram navami on odisha sea beach on occasion of ram navami by sudarsan pattnaik srk
First published on: 30-03-2023 at 17:38 IST