तामिळनाडूमध्ये, स्वच्छता विभागात काम करणाऱ्या एका स्वच्छता कर्मचाऱ्याला ७.५ लाख रुपयांचे १०० ग्रॅम सोन्याचे नाणे कचऱ्यामध्ये पडलेले आढळले. मग त्याने सोने त्याच्या मालकाला परत करण्याचा निर्णय घेतला. कुरिअर कंपनीत काम करणाऱ्या गणेश रमण यांनी आपल्या मेहनतीच्या पैशातून १०० ग्रॅम सोन्याचे नाणे खरेदी केले. त्याने ते गुलाबी रॅपिंग पेपरमध्ये झाकून बेडखाली ठेवले होते.

पत्नीने साफसफाई करताना फेकले नाणे

प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, गणेश रमण यांना सोन्याचे नाण्याला बेड खाली न दिसल्याने धक्का बसला. आधी त्याने सगळीकडे शोध घेतला. सापडले नाही तेव्हा बायकोला विचारले. यानंतर पत्नीने सांगितलेल्या गोष्टीमुळे तो स्तब्ध झाला.

( हे ही वाचा: वांगी आहेत की टोमॅटो? नाही, हे आहे ‘ब्रिमॅटो’; वाराणसीच्या शास्त्रज्ञांनी केला हटके प्रयोग )

असे सापडले नाणे

गणेश रमण यांनी सथांगुलम पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आणि सीसीटीव्ही फुटेजद्वारे त्या दिवशी परिसरातील कचरा साफ करणाऱ्या लोकांचा शोध घेतला. यानंतर पोलिसांना एक धक्कादायक गोष्ट समजली.

( हे ही वाचा: तीन चेहऱ्यांचा रागावलेला साप? जाणून घ्या व्हायरल फोटोमागचे सत्य)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका सफाई कामगाराने आधीच त्याच्या कार्यालयात सोन्याचे नाणे जमा केले होते. त्या व्यक्तीचे नाव मेरी आहे. कचरा वेगळा करताना मेरीने एक आवाज ऐकला होता. मग रॅपर उघडले आणि त्यातून एक सोन्याचे नाणे बाहेर आले. काहीही विचार न करता आणि लोभी न होता, मेरीने सोन्याचे नाणे तिच्या कार्यालयात जमा केले. नंतर, गणेश रमण आणि त्याचे कुटुंब सोमवारी सथांगुलम पोलीस स्टेशनमध्ये आले, जिथे पोलिसांनी मेरीला तिच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करून सोन्याचे नाणे परत केले.